एक्स्प्लोर

'मला अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय', खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

अजित दादांना (Ajit Pawar) राज्याच्या मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदी बसलेलं बघायचंय, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे.

पुणे :  'मला अजित दादांना (Ajit Pawar) राज्याच्या मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे', असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. तसेच देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन ही कोल्हे यांनी केलं. 

अमोल कोल्हे म्हणाले की, माझ्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असं ते म्हणाले. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीत आहे. 

शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Embed widget