Horse Market Indapur : सात ते आठ जातींचे घोडे अन् कोट्यावधींची उलाढाल! इंदापूरात भरलाय घोड्यांचा बाजार
Pune News: इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार (Horse Market )समितीत घोड्यांचा बाजार भरला आहे. या बाजारात देशभरातून घोडे दाखल झाले आहेत.
Horse Market Indapur : इंदापुरातील (Pune Indapur) कृषी उत्पन्न बाजार (Horse Market )समितीत घोड्यांचा बाजार भरला आहे. या बाजारात देशभरातून घोडे दाखल झाले आहेत. मारवाड, काठेवाड आणि सिंध जातीचे घोडे मोठया संख्येने आले आहेत. तसेच घोड्यांची नाच स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. या बाजारात व्यापारी, खरेदीसाठी आणि विक्रीसाठी अनेक अश्वप्रेमी दाखल झाले आहेत. लम्पी आजारामुळे यावर्षी कमी घोडे दाखल झाले आहेत. यावर्षी साधारपणे 400 ते 300 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
घोड्यांच्या 1 लाखापासून 15 लाखापर्यंत किंमती आहेत. अजून 10 ते 15 दिवस घोडे बाजार सुरू असणार आहेत. आतापर्यंत 60 ते 70 घोडयांची विक्री झाली आहे. आतापर्यंत दीड कोटींची उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या दरम्यान घोडे नाच काम आणि चाल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या बाजारात अनेक लोक विविध शहरातून घोडे खरेदीसाठी येतात. या बाजारात विविध प्रकारचे घोडे यंदा विक्रीसाठी आले आहेत. मारवाडी, सिंधी, पाकिस्तानी, गुजराती, कच्छ या सगळ्या जातीचे घोडे या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यात चालणारे घोडे घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेक लोक चालणारे घोडे घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून या बाजारात दाखल झाले आहेत. या बाजारात घोड्यांची स्पर्धादेखील भरवली जाते. ती स्पर्धा बघण्यासाठी गावकरी आणि अनेक शहरातून बाजारासाठी दाखल झालेले नागरीक उत्सुक असतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक नागरीक या ठिकाणी गर्दीदेखील करतात. मागील सहा वर्षांपासून इंदापूरात घोडेबाजार भरवला जात आहे. हा पुणे जिल्ह्यातील पहिलाच घोडेबाजार आहे. संपूर्ण देशातून वेगवेगळ्या जातीचे घोडे या बाजारात दाखल होतात. अनेक राज्यातून खरेदी-विक्रीसाठी येत असतात. सगळ्या खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्याची योग्य सोय केली जाते. त्यांच्यावर फार बंधनं लावण्यात येत नाहीत.
कोट्यावधींची उलाढाल...
या भव्य घोडे बाजारात विविध जातीचे घोडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. या बाराजातून सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल केली जाते. यावर्षी उत्तर प्रदेशातील घोड्यांची संख्या बाजारात जास्त प्रमाणात आहे. त्यांच्या किंमतीदेखील जास्त आहेत. त्यामुळे दरवर्षी अशाच प्रकारच्या घोडे बाजाराचं आयोजन करुन घोडे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करु आणि सगळ्या घोड्यांची हौस असणाऱ्यांना उत्तमोत्तम घोडे उपलब्ध करुन देऊ, असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितलं आहे.