Gunratna Sadavarte : अखंड भारताची चळवळ उभी करणार,हिंदूत्ववादी पक्षाकडून 'डंके की चोट पे' निवडणूक लढवणार; गुणरत्न सदावर्ते कडाडले
Gunratna Sadavarte, Pune : राजकारणाच्या नावावर आरक्षणाची दुकानदारी चाललेली आहे. ती थांबली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नाही, असेही सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्पष्ट केले.
Gunratna Sadavarte, Pune : "नथुराम गोडसे साहेबांच विचारपीठ निर्माण झालं पाहिजे. अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसोबत गेले. अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. हिंदुत्ववादी पक्षाकडून 'डंके की चोट पे'निवडणूक लढवणार", असं वकिल डॉ. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी म्हटलंय. पुण्यात नथुराम गोडसेच्या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी सदावर्ते आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले, नथुराम गोडसे साहेबांच विचारपीठ निर्माण झालं पाहिजे, पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतल्यांनतर त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यामुळे शक्ती प्रदान झालेली आहे.अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. राजकारणाच्या नावावर आरक्षणाची दुकानदारी चाललेली आहे. ती थांबली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नाही, असेही सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसोबत गेले
उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसोबत गेले. अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. हिंदुत्ववादी पक्षाकडून 'डंके की चोट पे'निवडणूक लढवणार आणि त्यांचं पाणीपत करणार आहे. मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांचा पॉलिटिकल गेम असू शकतो, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.
10 टक्के आरक्षणालाही सदावर्तेंचा विरोध, न्यायालयात जाणार
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणारा कायदा पास केला. यासाठी सरकारने विशेष अधिवेशनही घेतले होते. दरम्यान, या आरक्षणाविरोधातही न्यायालयात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा सदावर्तेंनी केली होती. "राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. मात्र हे संविधान सहमत कृत्य नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अहवालाला महत्त्व देऊ नये. राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ", असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.
गुणरत्न सदावर्तेंना बार काऊंसिल ऑफ इंडियाचा दिलासा
गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करत सदावर्तेंवर कारवाईचा बगडा उगारल होत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या