एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या 67 वरती, 13 रुग्ण व्हेंटीलेटरवर, काय आहेत लक्षणं?

Guillain Barre Syndrome: महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना करत आहे, ज्या भागात जास्त रूग्णसंख्या आढळून येत आहे, त्या भागातील पाण्याची तपासणी देखील केली जात आहे.

पुणे: पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. शहरातील गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण 67 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण पुणे महापालिका आणि 12 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका व 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी 43 पुरुष व 24 महिला आहेत. यापैकी 13 रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत. त्यामुळे आता महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना करत आहे, ज्या भागात जास्त रूग्णसंख्या आढळून येत आहे, त्या भागातील पाण्याची तपासणी देखील केली जात आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) चे शहराच्या हद्दीतील 46 रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी ते खडकवासलापर्यंतच्या भागातील आहेत. या रूग्णसंख्येतील 80 टक्के रुग्णांमध्ये आधी उलटी, जुलाब असे पोटविकाराचे (गॅस्ट्रोइंटेस्टायनल) लक्षणांचा इतिहास असल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

काही नमुन्यात जीवाणू तर काहींमध्ये विषाणू 

पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जीबीएस आजाराच्या रुग्णांच्या रक्ताचे आणि शौचाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. काल (गुरुवारी ता. 23) उशिरा नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. रुग्णांच्या काही नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही नमुन्यांत नोरोव्हायरस हा विषाणू आढळून आला आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)ची (Guillain Barre Syndrome) लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांमध्ये दूषित अन्न आणि पाण्यातून लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. लागण कशामुळे झाली, याची तपासणी एनआयव्हीमध्ये करण्यात आली आहे. त्यातून जीवाणू आणि विषाणू आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. जीवाणू अथवा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरावर हल्ला करते. त्यानंतर 1-3 आठवड्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नांदेड सिटी आणि किरकिटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण संख्या आढळली आहे, हा आजार दूषित अन्न आणि पाण्यातून झाल्याचं एनआयव्हीच्या अहवालात समोर आलं आहे, वाढत्या रूग्णसंख्येमुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे. 85 पथक सर्वेक्षण आणि जनजागृतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. 

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Embed widget