एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sasoon hospital drug racket : बायको वकील, बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यावहार; ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलच्या ड्रग्स रॅकेटची A to Z कहाणी

ललित पाटीलच्या ड्रग्स विक्रीची सुरुवात नेमकी कशी आहे? तो ड्रग्स विक्री नेमका कसा करायचा? बायकोकडून गुन्हेगारांना जामीन कसा मिळवून द्यायचा? याची संपूर्ण कहाणी एखाद्या वेबसीरीजला शोभण्यासारखी आहे. 

पुणे : ससूनमधून ड्रग तस्करी करणारा ललित पाटील ससूनमधून (sasoon hospital drug racket) पळून गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेकांची चौकशी सुरु आहे. मात्र ललित वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्स विक्री करत होता. त्याच्या ड्रग्स विक्रीची सुरुवात नेमकी कशी आहे? तो ड्रग्स विक्री नेमका कसा करायचा? बायकोकडून गुन्हेगारांना जामीन कसा मिळवून द्यायचा? याची संपूर्ण कहाणी एखाद्या वेबसीरीजला शोभण्यासारखी आहे. 

ड्रग्स रॅकेटची सुरुवात कधी सुरु?

तारीख होती 7 ऑक्टोबर 2020, पुण्याजवळील चाकणमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग तस्कर येणार असल्याची खबर लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दोन चारचाकी वाहनांमधून आलेल्या पाच जणांना अटक केली. चेतन दंडवते, अक्षय काळे आणि आनंदगीर गोसावी हे त्यांच्याकडे असलेलं 20 किलो मेफेड्रॉन विकण्यासाठी आले होते. तर दिल्लीवरून संजीव कुमार बन्सी आणि तौफिक हसन तस्लीम हे दोघे हे मेफेड्रॉन खरेदी करण्यासाठी आले होते. या कारवाईतून महाराष्ट्रातील एमआयडीसीजमधील बंद पडलेल्या फार्मासीटीकल्स कंपन्यांमध्ये चालणाऱ्या ड्रग्ज कारखान्यांचा उलगडा झाला. 

मेफेड्रॉनची 45 ते 50 टक्के तस्करी

अमली पदार्थांच्या एकूण तस्करीमधे मेफेड्रॉनचं प्रमाण 45 ते 50 टक्के आहे. कारण मेफेड्रॉन तयार करणं सोपं आहे. मेफेड्रॉन तयार करण्यासाठी वेगवेगळया प्रकारच्या केमिकल्स आणि एका लॅबोरेटरीची गरज असते. यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या एमआयडीसीमधील फार्मासीटीकल्स कंपन्या मेफेड्रॉन तयार करण्याचे कारखाने बनले आहेत. अंडरवर्ल्ड मधील गुन्हेगारांनी या फार्मासीटीकल्स कंपन्यांमधील वैज्ञानिकांना हाताशी धरुन मेफेड्रॉनचे कारखाने सुरु केले आहे. ससून रुग्णालयातून पळून गेलेला ललित पाटील याच रॅकेटचा एक भाग आहे.

छोटा राजनचे विश्वासू साथीदारांचा समावेश

चाकणमधे  पकडण्यात आलेलं मेफेड्रॉन रांजणगाव एमआयडीसीमधील या संयोग बायोटेक कंपनीत तयार करण्यात आलं होतं. अशोक संकपाळ यांच्या मालकीची ही कंपनी होती. मुळ कंपनीकडून जागा भाड्याने घेऊन या कंपनीत मेफेड्रॉन तयार करण्यात येत होतं आणि या ड्रग्सच्या कारखान्याचे मास्टरमाईंड छोटा राजनचे विश्वासू साथीदार तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर होते. 

2007 मध्ये एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तुषार काळे याची रवानगी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात करण्यात आली.  तिथे त्याची ओळख झुबी या नायजेरीयन नागरिकाशी झाली जो अमली पदार्थांच्य गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. झुबीने तुषार काळेला मेफेड्रॉन विक्रीतून मिळणारा नफा सांगितला आणि तुषार काळेने तिथून पुढे मेफेड्रॉन तयार करायचं ठरवलं. जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर येताच तुषार काळे आणि राकेश खानिवडेकरने मेफेड्रॉन तयार करण्याची खटपट सुरु केली. 

मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमधील अल्केमी केमिकल्स या कंपनीत पोहचले.  या कंपनीती परशुराम जोगल,  मंदार भोसले आणि अरविंद कुमार लोहारे या तिघांकडून मेफेड्रॉन तयार करुन ते विकलं जायचं.  या तिघांमधील अरविंद कुमार लोहारे हा आधी बोईसर आणि पालघरमधील केमिकल कंपन्यांमधे वैज्ञानिक म्हणून काम करायचा.  पण इमानदारीनं नोकरी करण्याऐवजी मेफेड्रॉन तयार करण्यातून मिळणारे पैसे कितीतरी अधिक असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने मेफेड्रॉन तयार करण्याच काम सुरु केलं.  

या अरविंद कुमार लोहारेला मेफेड्रॉन तयार करणाऱ्या माफियांकडून मोठी मागणी होती.  त्याच्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजायला हे ड्रग्स माफिया तयार असायचे. तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर या दोघांनी मेफेड्रॉन तयार करणं शिकून घेण्यासाठी तब्बल 35 लाख रुपये अरविंद कुमार लोहारे आणि इतर दोघांना दिले. त्यानंतर तुषार आणि राकेशने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक कंपनीत मेफेड्रॉन तयार करण्याचा कारखाना 2019 मधे सुरु केला. त्यासाठी कंपनीला प्रत्येक किलोमागे दोन लाख रुपये दिले जाणार होते. त्यासाठी मुंब्रामध्ये राहणाऱ्या जुबेर मुल्ला या वैज्ञानिकाला त्यांनी हाताशी धरलं.  त्यासाठी किरण राजगुरु या पालघर मधील केमिकल ठेकेदाराने कच्चा माल म्हणून केमिकल पुरवलं. 

रांजणगावच्या संयोग बायोटेक कंपनीत तब्बल 132 किलो मेफेड्रॉन 15 दिवसात तयार करण्यात आलं.  त्यापैकी 112 किलो मेफेड्रॉन तुषार आणि राकेश विक्रीसाठी मुंबईला घेऊन गेले आणि 20 किलो मेफेड्रॉन त्यांनी रांजणगावमध्येच ठेवलं. दरम्यान कोरोना काळातील लॉकडाऊन सुरु झाल्याने ते दोघे रांजणगावला फिरकले नाहीत.

उरलेला माल विकायला गेले अन् सापडले 

त्यामुळे कंपनीतील त्यांच्या इतर साथीदारांनी उरलेले वीस किलो मेफेड्रॉन विकायचं ठरवलं आणि ते विकताना ते पकडले गेले.  चाकण पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि तुषार काळे,  राकेश खानिवडेकर अरविंद कुमार लोहारे यांच्यासह वीस जणांना अटक केली. या वीस जणांच्या चौकशीतून ललित पाटील हा देखील या टोळीसाठी काम करत असल्याच समोर आलं. ललित पाटील अशा गुन्ह्यांमधे अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्याच काम करायचा.  त्यासाठी वकील असलेली त्याची बायको त्याला मदत करायची.

समीर वानखेडे एनसीबीचे प्रमुख असताना 2020 मध्ये पालघर एमआयडीसीमधील एका कंपनीवर छापा टाकून मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं आणि अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली. या गुन्ह्य़ातील आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी ललित पाटीलला संपर्क केला आणि मध्यस्तामार्फत त्याच्याकडे त्यासाठी 35 लाख रुपये आणि काही प्रमाणात मेफेड्रॉन देखील सोपवले.  ललित पाटीलने त्यांना जामीन मिळवून दिला. मात्र ते पालघरच्या गुन्हातून जामीन मिळवून बाहेर येताच चाकण पोलीसांनी त्यांना अटक केली.  त्यांच्या चौकशीतून ललित पाटीलचं नाव समोर आले आणि ललित पाटीलला या प्रकरणात 21 वा आरोपी करण्यात आले.  या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व  22 आरोपींची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. 

मुंबई पोलीस दलातील एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याला एका गंभीर गुन्ह्यात अटक करुन त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली होती. इथे या अधिकाऱ्यासोबत ललित पाटीलला ओळख झाली.  येरवडा कारागृहातील यंत्रणेला हाताशी धरुन हा बडतर्फ पोलीस अधिकारी आजारी असल्याचा बनाव करुन या ससुन रुग्णालयात पोहचला आणि त्याच्याच मदतीने ललित पाटील देखील इथे या ससुन रुग्णालयात दाखल झाला आणि ससुन रुग्णालयातील या 16 नंबर वॉर्डला त्याने ड्रग्ज विक्रिचा अड्डा बनवलं.

ससूनमधून बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यावहार 

अटक करण्यात आलेल्या तीन वर्षांपैकी 16 महिने ललित पाटील उपचारांचे कारण देऊन ससून रुग्णालयात ठाण मांडून होता. ज्या 16 नंबर वॉर्ड भोवती 24 तास पोलिसांचा खडा पाहरा असतो तिथपर्यंत मेफेड्रॉन आरामात पोहचत होता आणि ललित पाटील बसल्या जागी लाखों रुपयांचे व्यवहार करत होता. ललित पाटीलचा दुसरा अड्डा ससून हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं पंचतारांकित हॉटेल होता.  या हॉटेलमध्ये बनावट नावाने एक रुम कायमस्वरूपी बुक केलेले होती.  इथे तो त्याची बायको आणि नातेवाईक यांना नियमित भेटायचा. अर्थात हे सगळं पोलीस आणि ससूनच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सुरु होतं. ललित पाटील नियमीतपणे या हॉटेलमधे यायचा आणि काम संपल की ससुनच्या 16 नंबर वॉर्डमधे परतायचा. पण रविवारी या हॉटेलमध्ये आलेला ललित पाटील पुन्हा ससुनमधे परतलाच नाही आणि गोंधळाला सुरुवात झाली. 

ललित पाटील हा पळून गेल्यानं मोठी खळबळ उडालेली असली तरी मेफेड्रॉन तयार करणारी त्याची टोळी ज्यामध्ये भुषण पाटील या त्याच्या भावाचाही समावेश आहे. हेरॉईन, कोकेन, चरस यासारखे अमली पदार्थ तयार करण्यासाठी गांजाच्या शेतीची गरज असते.  त्याचबरोबर हे अमली पदार्थ एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना पकडले जाण्याचीही शक्यता असते.  त्या तुलनेत मेफेड्रॉन हे कुठल्याही लॅबोरेटरीत तयार करता येते आणि कच्चा माल म्हणून त्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या केमिकल्सची गरज असते. 

सहज उपलब्ध होणारं हे मेफेड्रॉन तेवढेच घातक आहे. शरीरच्या वेगवेगळ्या अवयवांवर ते परिणाम करतं आणि शेवटी मृत्युच्या दारात पोहचवतं. तरुणाईला यातून वाचवायच असेल तर एकट्या ललित पाटीलला पकडून उपयोग नाही तर अंडरवर्ल्डच्या मदतीने सुरु असलेली ही ड्रग रॅकेट मुळापासून खणून काढण्याची गरज आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळाला की त्याला पळवला? CCTV फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर

 
 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget