Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल
Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल
मंडळी, तुमच्या आमच्या महाराष्ट्राची मराठी ही राज्यभाषा आहे. या महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या, या महाराष्ट्रात आपल्या पोटापाण्यासाठी धंदा करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या मराठी तरुणानं मराठी बोलण्याचा आग्रह धरला, तर त्याचं काय चुकलं? पण इथं त्याच्यावरच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली तर काय म्हणायाचं? हा प्रकार घडला ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यात. एका अमराठी फळविक्रेत्याला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरल्याचा इतका राग आला की त्यानं जमाव गोळा करून मराठी तरुणावरच दादागिरी केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही हा सगळा प्रकार सहन करणाऱ्या मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केला. त्यामुळं सध्या राज्यभर संतापाची लाट उसळलीय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.