एक्स्प्लोर
पुण्यात बिल्डरवर अज्ञातांचा गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यात प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर शहा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पुणे : पुण्यात प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर शहा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरात काल शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात शहा गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवरील गल्ली नंबर आठमध्ये शहा यांचं घर आहे. त्यांच्या घराशेजारीच हा प्रकार घडला.
शहा यांच्यावर या हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या असून खंडणीसाठी हा गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाचपैकी तीन गोळ्या शहा यांना लागल्या. गोळीबार करणार्या दोन्ही दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधला होता. खंडणीच्या प्रकरणातून हा गोळाबार झाल्याचा संशय डेक्कन पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement