एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव
दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहीली असून कॉंग्रेस पक्षात असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती आणि अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 जून रोजी आत्महत्या केलेल्या जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर यांचं नाव आढळलं आहे.
मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने काल 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्षं दिपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते.
दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण एक जुनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याच म्हटलं आहे.
दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहीली असून कॉंग्रेस पक्षात असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती आणि अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement