एक्स्प्लोर

दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्ष, ओंकारेश्वर पुलावर 'अंनिस'चा मोर्चा

हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, मेधा पानसरे यासारखे मान्यवर अंनिसतर्फे काढल्या गेलेल्या मोर्चात सहभागी झाले

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. पाचव्या स्मृतिदिनी राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ 'अंनिस'चे कार्यकर्ते जमले आहेत. 'मारेकरी सापडला, सूत्रधार कधी?' असा सवाल 'अंनिस'कडून सरकारला विचारण्यात येत आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत अंनिसचे कार्यकर्ते मोर्चा काढत आहेत. गीतांच्या माध्यमातून सुरुवातीला दाभोलकरांना अभिवादन करण्यात आलं. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, मेधा पानसरे यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला पाच वर्षे पूर्ण
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पूलावर डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. याशिवाय आधीच सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. सचिन अंदुरेला अटक नालासोपाऱ्यातील स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. स्फोटक प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना अटक करण्यात आली. यातील शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्याला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे कोण आहे? सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे. “वीरेंद्र तावडेच दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड” 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ज्या दोन मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यातील एक सचिन अंदुरे आहे. हा संपूर्ण कट अगोदरच अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याने रचला आहे. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज सीबीआयने कोर्टात केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या रिमांडमध्ये संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलंय. जवाब दो कॅम्पेन अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्यभरातील विवेकवादी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप डीपी यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सराकरला जाब विचारला जात आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार कधी गजाआड होणार, असा सवाल करत सोशल मीडियावरुन ‘जवाब दो’ कॅम्पेन चालवले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP MajhaZero Hour : युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही, Ramdas Athawale यांनी व्यक्त केली नाराजीZero Hour : मविआत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत तर महायुतीत जागांवरुन संघर्ष  ABP MajhaZero Hour Guest Centre : कुणाला जास्त फायदा झाला यावर चर्चा करण्यात अर्थ नाही- विश्वजीत कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Embed widget