एक्स्प्लोर

Dr. Narendra Dabholkar Case Verdict : मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकरला जन्मठेप, तिघे निर्दोष

Dr. Dabholkar Case Verdict : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.

Dr. Narendra Dabholkar Case Verdict : पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर  यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी; सश्रम जन्मठेपेसह, पाच लाखांचा दंड 

कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत.यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 

पाच आरोपींविरोधात खटला, तिघे निर्दोष, दोघे दोषी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.  

कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.

पुराव्यांअभावी तीन आरोपी निर्दोष 

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

वकिलांनी काय सांगितलं? 

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल आला. एकूण पाच आरोपींना केसला सामोरं जावं लागलं. यामधील वीरेंद्र तावडे कटकारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं, संजीव पुनाळेकर यांना शस्त्र नष्ट करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष केलं. शिवाय विक्रम भावे यांनाही निर्दोष सुनावलं. 

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाखांची दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा असेल. 

जो निकाल आला आहे त्या निकालाचा आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने, आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं.

दाभोलकरांचे वकील अभय नेवगी काय म्हणाले? 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दाभोलकर कुटुंबीयांची बाजू कोर्टात मांडणारे वकील अभय नेवगी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी अकरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य सूत्रधार ज्यांनी हा कट रचला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश आहे. समाधान फक्त एवढंच आहे की, ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा मिळाली. मास्टर माईंडपर्यंत अजूनही पोहोचू शकलेलो नाही, यावरही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, तपासात होत आलेला हलगर्जीपणावरही नाराजगी व्यक्त केली आहे. दाभोलकर हे समाजसेवक होते, दिवसा ढवळ्या यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अनेक पुरावे दिले. आम्ही वरच्या कोर्टात धाव घेणार आहोत. या प्रकरणात आज कोर्टानं तिघांची निर्दोष सुटका केली आहे, याचाच आधार घेत जे दोन दोषी आहेत, तेसुद्धा वरच्या कोर्टात दाद मागू शकतात.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेनं, नेमकं काय घडलेलं?

अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेनं सुरु होता. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता, तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीचा तपास झाल्याचं समोर आलं. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होती सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.

काँब्रेड पानसरे, एम एन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एआयटी करुन करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आलं की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडलं. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही. 

दाभोलकरांची हत्या नेमकी कशी झाली?

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती. शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे अशी मारेकऱ्यांची नावं असल्याचं पुढे तापासातून समोर आलं.

या दोघांनी पाठिमागून दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली. त्यामुळे याच पुलावरुन अंनिसकडून निर्धार रॅली काढण्याचा अंनिसने घेतला.  दाभोळकरांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता. त्यामुळे समाजातून त्यांच्यावर अनेकदा टीका टीपण्णी देखील केली जात होती. त्यामुळेच दाभोळकरांची हत्या झाली असल्याचं म्हटलं जातं. 

पाहा व्हिडीओ : Narendra Dabholkar Case Verdict : Virendra Tawde याच्यासह पाच पैकी तीन आरोपी निर्दोष मुक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
Embed widget