एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

थोरले पवार म्हणाले, जनता 'त्यांना' धडा शिकवेल; आता मानसपुत्र वळसे पाटील म्हणतात...

Maharashtra Politics: पवार साहेबांचं वक्तव्य व्यवस्थित ऐका, ते जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. एवढंच बोलून वळसे पाटील थांबले आणि त्यांनी त्यासंदर्भात अधिकचं बोलणं टाळलं.

Dilip Walse Patil On Sharad Pawar : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुण्याच्या (Pune News) जुन्नरमध्ये (Junnar) जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. अशी भूमिका पवारांचे मानसपुत्र समजले जाणारे मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी घेतली असून वळसे पाटलांनी शरद पवारांवर अधिकचं बोलणं टाळलं. दरम्यान, मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल. असं वक्तव्य शरद पवारांनी काल जुन्नरमध्ये केलं होतं. त्यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर वळसे पाटलांनी काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. 

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आज (सोमवारी) पुण्याच्या खेड तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरुन त्यांना प्रश्न विचारले. त्यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, पवार साहेबांचं वक्तव्य व्यवस्थित ऐका, ते जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. एवढंच बोलून वळसे पाटील थांबले आणि त्यांनी त्यासंदर्भात अधिकचं बोलणं टाळलं. तसेच, पुढे बोलताना तहसीलदार हे पद कंत्राटी पद्धतीनं भरणं योग्य नाही, पण अनेक विभागांमध्ये काहीकाळासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती होते, तिथं तातडीनं गरज असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते गरजेचं असतं, असं म्हणत वळसेंनी एका अर्थाने सरकारची पाठराखणचं केली.

काय म्हणालेले शरद पवार?

भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.  ते म्हणाले की जे लोक भाजपसोबत गेले ते लोक राष्ट्रवादीचे असूच शकत नाही. कोणी भाजपबरोबर जायची भमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असेल, तर तो विचार आम्ही स्विकारणार नाही. त्यासोबतच मतदानपेटीतून मी आणि राष्ट्रवादी कोणाच्या मनात आहे, हे नक्कीच कळेल, असंही ते म्हणाले होते. तसेच, मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल, असंही वक्तव्य शरद पवारांनी पुण्यातील जुन्नरमध्ये बोलताना केलं होतं. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली.  मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती जरी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असली तरी या बाजार समितीत वळसे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचा विरोध डावलून निवडून आले होते. शरद पवारांची कालची (रविवारी) बैठक आयोजित करण्यात निकम यांचा पुढाकार होता. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यामुळेच व्यक्त केली जात आहे. खासदार अमोल कोल्हे हे देखील यावेळेस उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Embed widget