(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष, फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान
Harshawardhan Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापुरात येत असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नाराजी काढल्यानंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत.
Harshwardhan Patil : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी भाजपने (BJP) जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत (Ajit Pawar) असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापुरात (Indapur) येत असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नाराजी काढल्यानंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी मोठं विधान केले आहे. आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस हे उद्या हेलिकॉप्टरने इंदापुरात येत आहेत. त्याकरिता मैदानावर तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅडची पाहणी हर्षवर्धन पाटील यांनी केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा उद्या इंदापुरात आहे. आम्ही महायुतीचे काम सगळ्यांनी करायचं आहे. पण महायुतीचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. आमचे काही प्रश्न आहे ते आमचे कार्यकर्ते मांडतील. आजपर्यंत भाजप लढणार असे वाटत होते त्यानुसार काम करीत होतो पण समिकरणे बदलली. आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हा अन्याय आमच्याच महायुतीतील मित्र पक्ष करीत आहेत. त्याची जबाबदारी घ्यावी, देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतले आहे, असे त्यांनी म्हटले.
आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष
ते पुढे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. त्याला अजित पवार देखील उपस्थित होते. मागच्या घटना का घडल्या? हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हते त्या त्यांना सांगितल्या. दिल्लीतून निरोप आला आणि एकत्र बसायला सांगितले होते. यातून तोडगा देवेंद्र फडणवीस काढतील. आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष आहे. आता राजकीय समीकरण बदलली आहेत. लोकसभा झाल्यावर हे उदभवू नये ही जर उदभवली तर काय करायचं. ज्यांच्या साठी आज आम्ही करतो आहे. त्यांनी आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल ना? हे साहजिकच आहे, असे त्यांनी अजित पवारांना नाव न घेता सुनावले.
भविष्यात प्रश्न उद्भवतील त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील
विधानसभा निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली नाही. आता लोकसभेची चर्चा सुरू आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बदल झाले आहेत. हा फिक्स थमरोल नाही. इथून पुढे महायुतीचे काम असले पाहिजे, विकास कामेदेखील महायुतीचे झाले पाहिजे. कार्येकर्ते माझ्याजवळ काय बोलले ते सगळं देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. जे भविष्यात प्रश्न उद्भवतील त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील.
सुप्रिया सुळे यांनी ज्यांना निवडून आणले ते कुठं आहेत?
सुप्रिया सुळे यांना मदत केली आहे. 2019 ला त्यांनी मदत केली असती तर हा प्रश्न निर्माण झाला असता का? ज्यांना त्यांनी मदत केली ते तरी त्यांच्यासोबत राहिले आहेत का? आम्हाला विरोधक म्हणून ट्रीट केलं. सुप्रिया सुळे यांनी ज्यांना निवडून आणले ते कुठं आहेत? ज्यांना निवडून आणले त्यांच्याकडून अपेक्षा करायची नाही ज्यांना पाडले त्यांच्याकडून अपेक्षा करायची. आम्ही मदत 2009,2014,2019 आणि 2004 मदत केली होती. आम्ही कोण आहोत हे आम्हाला माहीत आहेत. आम्ही भाजपत आलो आम्ही काही मागितले नाही. मागणे आमचा स्वभाव नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा