एक्स्प्लोर
Advertisement
देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होतील : महादेव जानकर
ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असा सल्ला महादेव जानकरांनी दिला.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. भविष्यात ते पंतप्रधान होतील, असं भाकित राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाल्याचंही जानकर म्हणाले. ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असा सल्लाही जानकरांनी दिला.
ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने पुण्यात आयोजित कार्यक्रमात महादेव जानकर यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना, ब्राह्मण ही जात किंवा धर्म नसून एक व्यवस्था आहे. ज्या क्षेत्रात, जो माणूस सक्रिय होतो, तो ब्राह्मण होतो, हीच या देशाची व्यवस्था आहे, असं जानकर म्हणाले.
ब्राह्मण समाजाने स्वतःला कमी न समजता राजकारणात आलं पाहिजे. राजकारणापासून दूर राहू नये, ब्राह्मण एक असला तरी लाखाला भारी आहे, हे विसरु नये, असं महादेव जानकर म्हणाले.
या देशात ज्याला ब्राह्मणाचा हात लागतो, तो 'हिस्ट्री मेकर' होतो. महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षक ब्राह्मण होते, महात्मा फुले यांना शाळेसाठी वाडा देणारे भिडे हे देखील ब्राह्मणच होते असं जानकर म्हणाले.
या देशात समता, स्वातंत्र्य, बंधूता कायम राखण्याचं काम ब्राह्मण समाजानेच केलं आहे. आज ब्राह्मण समाजात गरिबी आहे. ब्राह्मणांनी या देशात आरक्षण मागितलं पाहिजे. या समाजाची व्यथा कोणी मांडायची? असा प्रश्नही जानकरांनी विचारला.
या समाजामुळे तेल्याचा चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला, माझ्यासारख्या धनगराच्या मुलाला मंत्रिपद मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत, जे वंचितांसाठी काम करत आहेत. सर्व समाज घटकासाठी काम करणारे फडणवीस आहेत, पुढील काळात ते देशाचे पंतप्रधान होतील, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.
ब्राह्मणांविरोधात कोणी बोलत असेल, तरी काळजी करु नका. मी तुमच्यासोबत आहे. हत्ती आपली चाल चालत असतो, भुंकणारे भुंकत असतात, असं जानकर यावेळी म्हणाले. ब्राह्मण समाज हा दाता समाज आहे. ब्राह्मणांनी प्रोत्साहन दिलं म्हणजे त्या माणसाचं आयुष्य यशस्वी होतं. ब्राह्मण सुधारला तर देश सुधारेल. या समाजातील मान्यवरांनी समाजाला मदत केली पाहिजे, असं सांगत ब्राह्मण समाजाला राजकारणात येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement