एक्स्प्लोर

सलग दुसऱ्या वर्षी मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर

नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या 129 वर्षात सलग दुसऱ्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ.रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.

यंदाचे वैशिष्ट्य, ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर

ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, याकरिता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर  जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडीओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आरती करतानाचा व्हिडीओ तयार होणार आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद व्हिडीओ पाहून भक्तांना घेता येईल.

विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत

शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. भाविकांकरीता मंदिर परिसरात दोन मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून त्याद्वारे श्रींचे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरासमोर दोन्ही बाजूला रेलिंगची सोय करण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी या स्थानाचे महत्व अबाधित रहावे, याकरीता तेथे देखील एका एलईडी स्क्रिनची सोय करण्यात आली आहे.

मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई व दररोज 21 किलो मिष्टांनांचा भोग

गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग श्रींसमोर लावण्यात येणार आहे. याशिवाय श्रींना दररोज वेगवेगळे महाउपरणे देखील घालण्यात येणार आहे. यावर गणेशांची विविध नावे साकारण्यात आली आहेत. अष्टविनायकांची मयुरेश्वर, सिद्धीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही 8 नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी 10 उपरणी तयार करण्यात आली आहे. दररोज एक उपरणे श्रींना घालण्यात येईल. मंदिरामध्ये व  परिसरात कायमस्वरुपी असलेल्या 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा ऑनलाईन
 
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक 11 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता प्रातिनिधीक अथर्वशीर्ष पठण व श्रींची महाआरती ऑनलाईन पद्धतीने होईल. तर 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी महागणेश याग आणि दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत लक्षावर्तन, होम-हवन हे वेदमूर्ती नटराज शास्त्री करणार आहेत. तर, ब्रह्मणस्पती सुक्त पारीजात वेदमूर्ती धनंजय घाटे व ब्रह्मवृंद करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी 6 वेदमूर्ती मधुकर जांभेकर गुरुजी मंत्रजागर करणार आहेत. उत्सवकाळात श्रींची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभवता येणार आहे. सकाळी 7.30 व रात्री 9 वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
 
श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi NewsTop 50 News : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMuddyache Bola | Jaysingpur | मुद्याचं बोला | जयसिंगपूरची जनता यड्रावकरांना पुन्हा संधी देणार?Sadabhau Khot  On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
Embed widget