Curfew In Pune | पुणे, पिंपरी चिंचवड सील; हवेली तालुका, बारामती नगरपरिषद हद्दही सील
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात येणार आहेत.
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 सुरु राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. तर, सोमवार म्हणजेच आजपासून पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे.
संपूर्ण पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र (contempt zone) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. हे संक्रमणशील क्षेत्र 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात आलं आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही. हे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करावे लागणार आहेत. या संक्रमणशील क्षेत्रातील आयटी कंपन्यांनाही पन्नास टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरु करता येणार नाही. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून या आयटी कंपन्या जशा पाच ते दहा टक्के कर्मचाऱ्यांसह काम करत आहेत तसंच त्यांना इथून पुढेही करावं लागणार आहे.
औरंगाबादकरांसाठी खुशखबर! आज एकाच दिवशी पाचजण कोरोनामुक्त
लॉकडाऊनचे नियम
- संक्रमणशील क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करावे लागणार आहेत.
- संक्रमणशील क्षेत्रातून कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला या उद्योगांच्या ठिकाणी जाता येणार नाही.
- संक्रमणशील क्षेत्राच्या बाहेर असे उद्योग सुरु करायचे असल्यास त्या उद्योगांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच राहण्याची सोय करावी लागेल.
- आयटी कंपन्यांना देखील हे नियम लागू असेल.
- हे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योगांनाा परवानगी.
- एका अर्थाने हे निकष पूर्ण करा आणि उद्योग सुरु करा असं प्रशासनाचं सांगणं आहे. हे निकष पूर्ण करुन किती उद्योग सुरु होत आहेत हे आताच सांगता येणार नाही.
हॉटस्पॉटमधल्या मजूर, अधिकाऱ्याने उद्योगाच्या ठिकाणी जाऊ नये : दीपक म्हैसेकर जे हॉटस्पॉट आहेत, त्याची परवानगी घेता येणार नाही, हे स्पष्ट केलं आहे. पुण्याच्याबाबतीत विचार करताना, केवळ पुणेच नाही तर संपूर्ण राज्यात हे धोरण अवलंबणार आहे. हॉटस्पॉटमधला कुठलाही मजूर, अधिकारी किंवा पर्यवेक्षक उद्योगाच्या ठिकाणी जाणार नाही, असं विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.
नियम मोडल्यास पोलीस गुन्हे दाखल करतील : महापौर पुणे शहरातील सर्व हद्दी आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. कोणतेही नियम आपण मोडू नये. नियमांमध्ये राहून, सूचनांचं पालन करावं. नियम मोडल्यास पोलीस कठोर कारवाई करतील, गुन्हे दाखल करतील. त्यामुळे या सगळ्यापासून दूर राहू या. आपली काळजी घेऊ, शहराची काळजी घेऊ. या सगळ्या गोष्टी आपल्या हितासाठी करत आहोत, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
कोरोना लॉकडाऊन नियम : राज्यात 20 एप्रिलपासून काय सुरू होणार
राज्यात पुणे जिल्हा कोरोना संक्रमितांच्या संख्येत दुसऱ्या नंबरवर आहे. पुणे - 17 (मृत्यू 1) पुणे मनपा - 546 (मृत्यू 49) पिंपरी-चिंचवड मनपा - 48 (मृत्यू 1)
Curfew in Pune | पुणे जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन कडक