Pune Crime Paud Temple: पौडच्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना; पितापुत्राविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTVमध्ये कैद, आज बंदची हाक
Pune Crime Paud Temple: अन्नापुर्णा देवीचे मुर्ती देवळातून खाली घेवून विटंबना केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेने गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुणे: पुण्यातील पौड (ता. मुळशी) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची एका युवकाने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने गावामध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे. अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला. त्याने अन्नापुर्णा देवीचे मुर्ती देवळातून खाली घेवून विटंबना केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेने गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
घटना समोर येण्याआधी सायंकाळी रितेश जाधव हे नागेश्वर मंदिरात आल्यानंतर अन्नापूर्णा देवीची मूर्ती हलवली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब शिवाजी वाघवले यांना सांगितली. वाघवले व जाधव आणि इतर काही जणांनी मांदिरात असलेला सीसीटीव्हीची तपासणी केली असता चाँद हा मुर्तीची विटंबना करताना दिसला. हे कृत्य करणारा कोण आहे आणि तो कुठे राहतो याची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्या सर्वांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांकडे चौकशी केली, त्यावेळी चाँदचे वडील नौशाद शेख यांनी आलेल्या या तरूणांनाच शिवीगाळ केली. यानंतर या जमावातील काही जणांनी चाँद शेख व नौशाद शेख या बाप-लेकाला पौड पोलिस स्टेशनमध्ये आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पौड पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी जमावाला शांत केले तसेच चाँद शेख व नौशाद शेख यांना उपचारासाठी पौड ग्रामीण रूग्णालय व तेथून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
आज पौडमध्ये बंदची हाक
या घटनेनंतर गावात संताप व्यक्त होत आहे. आज पौडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. चाँद शेख व नौशाद शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुण्यात निषेध करण्यात येत आहे. आज मुळशी तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं, आंब्याच्या आडीतील दोन आंबे नासले म्हणून पूर्ण आडी नासलेली नसते. माझं दोन्ही समाजाला आवाहन आहे, शांत राहून या घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे, त्या दोघांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी पौड पोलिस ठाण्याला निवेदन सादर केले. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.























