Pune Echallans News: ई-चलनच्या फुकटच्या त्रासापासून पुणेकरांची सुटका; या व्हॉट्सअॅपनंबरवर संपर्क करा
चुकीचे ई-चलन असल्यास 8411800100 या व्हॉट्सअॅपनंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला पुणेकरांना दिला आहे.

Pune Echallans News: पुणेकर त्यांच्या वाहनांवर असलेल्या ई-चलनमुळे त्रस्त होते. त्याबबात अनेकांनी तक्रारी दिल्या होत्या. गाडी दुसऱ्याचीच आणि ई-चलन दुसऱ्यालाच अशी परिस्थिती होती. अनेकदा तर हेल्मेटअसूनसुद्धा दंड आकारण्यात आला होता. या सगळ्या तक्रारींवर पुणे पोलिसांनी उपाय शोधला आहे. त्यांनी एक व्हाॅट्सअॅप नंबर दिला आहे. त्यानंबरवर चुकीचा ई-चलन आलं असेल तर तक्रार करुन दंड कमी होणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्वीटकरुन ही माहिती दिली आहे.
ई-चलन कसं तपासणार?
ई-चलन कसं तपासणार याबबात अनेकदा पोलीसांना प्रश्न विचारण्यात आले होते. जेव्हा गाडी पडकली जाते तेव्हा मोठा दंड आकारल्या गेल्याची माहिती मिळते मात्र आता http://mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या वाहनावर किती दंड आहे?, याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तीन स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे.
1) http://mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर लॉगईन करा.
2) वाहन क्रमांक टाका.
3) वाहनाचा चासी क्रमांक टाका.
या तीन स्पेप्स पुर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनावर असलेला दंड किंवा ई-चलन बघता येणार आहे. त्यासोबतच फोटोवरुन दंड आकारला गेला असेल तर फोटोदेखील बघायला मिळणार आहे
#पुणे ..मला तुमच्यापैकी बरेच जण विचारत आहेत की आम्ही आमच्या वाहनाविरुद्ध प्रलंबित #Echallans कसे तपासू शकतो?
त्यासाठी या पायऱ्या आहेत:
✅https://t.co/MPMrX38WVh वर जा
✅वाहन क्रमांक & चासी नंबर समाविष्ट करा
चुकीचे इ-चलन असल्यास व्हाट्सअप करा ८४११८००१००.#Pune pic.twitter.com/dDtnQNivzv
">
चुकीचं चलन असल्यास व्हॉट्सअॅपवर पाठवा
पुणेकरांना अनेकदा या ई-चलनाचा ताप झाला होता. वाहन दुसरं, चलन दुसऱ्याला किंवा फोटो दुसऱ्याच्या वाहनाचा मात्र दंड दुसऱ्याला अशा अनेक तक्रारी पुणेकरांनी पोलिसांकडे केल्या होत्या. ही समस्या का निर्माण झाली होती याबाबत काहीच स्पष्टीकरण आलं नाही मात्र यावर पुणे पोलिसांनी उपाय शोधून काढला आहे.चुकीचे ई-चलन असल्यास 8411800100 या व्हॉट्सअॅपनंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला पुणेकरांना दिला आहे.
चुकीच्या दंडापासून दिलासा
या व्हॉट्सअॅपनंबरमुळे पुणेरांचा संताप कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात रोज शेकडो नागरीकांवर ई-चलनमार्फत दंड आकारण्यात येतो. चौका-चौकात कॅमेरे लावले आहेत. त्यामार्फत हेल्मेट नसलेल्या नागरीकांवर देखील फोटोमार्फत दंड आकारण्यात येतो. आता मात्र चुकीचा दंड झाल्यास पुणेकरांना थेट व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करता येणार आहे. त्यामुळे यापासून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
























