एक्स्प्लोर

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेसचा एकनिष्ठ नेता लावला गळाला, मावळमध्ये घडामोडींना वेग, अजितदादांचा पक्ष काँग्रेसला धक्का देणार?

Maval Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा नेत्याला आपल्या पक्षात घेण्यास यश मिळवलं आहे.

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच पुण्यातील मावळ मतदारसंघात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा नेत्याला आपल्या पक्षात घेण्यास यश मिळवलं आहे. काँग्रेस पक्षाचे माजी मावळ तालुकाध्यक्ष व माजी पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. किरण शंकरराव गायकवाड (Kiran Gaikwad) यांनी त्यांच्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांना ईमेलद्वारे गायकवाड यांनी राजीनामा पाठवला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

डॉ. किरण शंकरराव गायकवाड (Kiran Gaikwad) हे सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. अशातच आगामी निवडणुकीत याचा फायदा शेळकेंना होणार असल्याची शक्यता आहे.

किरण गायकवाड कोण आहेत?

गायकवाड (Kiran Gaikwad) कुटुंब हे सुरुवातीपासूनच काँग्रेससोबत राहिलेलं आहे. किरण गायकवाड पक्षाचे एकनिष्ठ नेते होते. गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय दिसत नव्हते. किरण गायकवाड यांनी मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. डॉ. किरण गायकवाड (Kiran Gaikwad) यांनी काँग्रेस पक्षात आजवर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया चे शहराध्यक्षपद, मावळ तालुका युवक अध्यक्ष पद, तालुका अध्यक्षपद, जिल्हा सरचिटणीस पद अशा आदी जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत. 2014 साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. काही काळापासून ते फार सक्रिय नव्हते. 

किरण गायकवाड (Kiran Gaikwad) यांची काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आमदार सुनील शेळके यांच्यासोबत दिसत आहेत. याच दरम्यान सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लवकरच ते सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यासोबत जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश केला जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आता येत्या विधानसभा निवडणुकीआधी किरण गायकवाड (Kiran Gaikwad)  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
Embed widget