एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, 4 जणांचा मृत्यू
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कामशेत बोगद्याजळ कार आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण चारजणांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कामशेत बोगद्याजवळ एका गाडीचे आईल सांडले होते. त्यावरुन एक कार घसरली आणि ती बसखाली गेल्याने हा अपघात झाला.
या अपघातात कारचालकासह दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चालक दीपक, श्रद्धा पाटील, भगिनी देशमुख, दत्तात्रय देशमुख यांचा समावेश आहे. राखी पाटील, ओम देशमुख, संजना पाटील, रुपेश देशमुख हे चारजण गंभीर जखमी आहेत. तर राहुल देशमुख आणि रुपाली देशमुख किरकोळ जखमी असल्याचं समजतं आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे सर्व मुंबईच्या वसई-विरार भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातानंतर पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, कामशेत बोगद्याजवळील आज सकाळापासूनचा हा दुसरा अपघात आहे. आज सकाळी ट्रक आणि क्रेनच्या धडकेत दोघेजण जखमी झाले होते. या अपघातामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. महामार्गावर 2 किलोमीटरहून अधिकच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement