एक्स्प्लोर

सिगरेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, लाखोंची लूट

पोलिसांनी तपास केला असता 7 लाख 55 हजार रुपयांचा 20 तोळे ऐवज या मुलाने भीतीपोटी दोन्ही मित्रांना दिला असल्याचं समोर आलं.

पुणे : पुण्यात बिबवेवाडी परिसरात एका 13 वर्षाच्या मुलाला त्याच्याच मित्रांनी सिगरेट ओढण्यास देऊन, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी तब्बल 7 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दिवाळीपासून हा सर्व प्रकार सुरु होता. आईला घरातील दागिने न सापडल्यामुळे वडिलांनी विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन सोनारांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. रेवणसिद्ध शिलवंत आणि आदित्य वांद्रे, अशी अटक करण्यात आलेल्या सोनारांची नावे असून, त्यांनी दोघा अल्पवयीन मुलांकडून ते दागिने विकत घेतले आहेत. मुलाचे वडील वसतिगृह चालवतात. त्यांना आई-वडील, पत्नी व दोन मुले, असा त्यांचा कुटुंब आहे. पीडित हा त्यांचा लहान मुलगा आहे. तर मोठा मुलगा हा बारावीत शिकत आहे. दरम्यान, 18 जानेवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या मलाचा बारशाचा कार्यक्रम होता. यावेळी पीडित मुलाच्या आईने घरातील पोटमोळ्यावरील कापाटात ठेवलेले दागिने काढण्यासाठी पाहिले असता तेथे दागिने मिळाले नाही. त्यानंतर घरात इतरत्र शोधूनही दागिने न मिळाल्याने वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना खडसावून विचारले असता. लहान मुलगा पीडित हा एकदम रडू लागला. वडिलांनी  त्याला विश्वासात घेऊन रडण्याचे कारण विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या दोन मित्रांनी आणि आरोपी वांद्रे याने त्याला सिगरेट ओढायचे शिकवून सिगरेट ओढत असताना त्याची मोबाईलवर व्हिडिओ क्लिप बनवली. त्यानंतर त्याला पैशासाठी ब्लॅकमेल केले. पैसे न दिल्यास हा व्हिडिओ तुझ्या वडिलांना दाखवू तसेच सोशल मीडियावर अपलोड करु अशी धमकी दिली. पोलिसांनी तपास केला असता 7 लाख 55 हजार रुपयांचा 20 तोळे ऐवज या मुलाने भीतीपोटी दोन्ही मित्रांना दिला असल्याचं समोर आलं. पोलिसांनी यातील बऱ्यापैकी ऐवज हस्तगत केला आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलाशी सवांद वाढवून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Embed widget