एक्स्प्लोर

Pune news : भाजप आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली, नेमकं काय घडलं होतं?

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला मारहाण केली. वाढती नाराजी पाहता लांडगे (mahesh landage) यांनी पटेल समाजाची माफी मागितली.

पुणे : भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला मारहाण केली. पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वांसमोर हा प्रकार घडला आहे.  लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही (CCTV Footage Video) ही समोर आला, त्यामुळं आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. वाढती नाराजी पाहता लांडगे (mahesh landage) यांनी पटेल समाजाची माफी मागितली आणि लवकरच नितीन बोऱ्हाडे आणि बिल्डर नरेश पटेलांचा वाद मिटवेन, असं आश्वासन ही आमदार लांडगे यांनी दिलं.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेल यांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्या जमिनीतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून हा वाद सुरू होता. या वादाची सुनावणी पालिकेत झाली आणि त्यानंतर बोऱ्हाडे यांनी पटेलांना मारहाण केली. नितीन बोऱ्हाडे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळं या मारहाणीनंतर लांडगे अडचणीत आले होते. ही अडचण दूर करण्यासाठी थेट आमदारांनी पटेल समाजाची माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं होतं?

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या  पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  ही कैद झाला होता. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे  यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत. त्यांनी बिल्डर नरेश पटेलांवर सर्वांदेखत हात उचलण्याचा पराक्रम केला होता.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर 644 मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरुयेत. त्याची सुनावणी महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. यातून नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली होती. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखलं आणि प्रकरण तिथंच निवळलं होतं. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. 'तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही', असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होतं, त्याच रागात हे घडलं, असं मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तर मी असं काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला होता.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांचा निशाणा

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur hydraulic weighing machine: कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
Rohit Sharma: वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना दिलासा
अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना दिलासा
Nobel Prize : अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur News : धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारात फसवणूक, नेमकं प्रकरण काय? ABP Majha
Maharashtra Farmers Help : शेतकऱ्यांसाठी शिवसेना मैदानात, हेक्टरी 50 हजारांची मागणी
Maharashtra Superfast News : 8.00 AM : 8 च्या अपडेट्स : Maharashtra News : ABP Majha
Navi Mumbai Airport : शरद पवार ते नरेंद्र मोदी, नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणा कोण कोण उपस्थित?
Kolhapur Sugarcane : सरकारकडून काटामारी होत असल्याची कबुली, दीड कोटींची यंत्रणा धुळखात पडली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur hydraulic weighing machine: कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
Rohit Sharma: वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना दिलासा
अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना दिलासा
Nobel Prize : अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
Sayali Patil : नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
Video: 2 सप्टेंबरच्या GR ला स्थगिती नाही, हायकोर्टाच्या निर्णयावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; जरांग्या म्हणत पुन्हा डिवचलं
Video: 2 सप्टेंबरच्या GR ला स्थगिती नाही, हायकोर्टाच्या निर्णयावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; जरांग्या म्हणत पुन्हा डिवचलं
Embed widget