एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Navi Mumbai Airport : शरद पवार ते नरेंद्र मोदी, नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणा कोण कोण उपस्थित?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो तीनच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक हजार १६० एकरवर पसरलेले असून, त्यात दोन धावपट्ट्या आणि चार टर्मिनल आहेत. या विमानतळाची वर्षाला नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. विमानतळाचे उद्घाटन आज होत असले तरी, विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर डिसेंबरपासून कार्गो वाहतूक सुरू होईल. विमानतळावर इमिग्रेशन चेकपोस्टसाठी २८५ नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. तसेच, स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी १०८ पदांची भरती केली जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर अनुभवता येणार आहे, ज्यात लावणी, दहिहंडी, गोंधळी, झेलक्यांचा ठेका, आदिवासी आणि आगरी कोळी नृत्यांचा समावेश आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement


















