एक्स्प्लोर

Rohit Sharma: वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल

Rohit Sharma Team India ODI captaincy: रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर पुन्हा खेळतील की नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, रोहित शर्माने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले

Rohit Sharma Team India ODI captaincy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवस सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली होती. यावेळी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला होता. कारण, भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कर्णधारपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रोहितच्या जागी शुभमन गिलला (Shubhman Gill) कर्णधारपदाचा मुकूट सोपवला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा हा कदाचित शेवटचा दौरा असू शकतो, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. 

आगामी विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा फिट बसणार नाही, असे सांगितले जाते. त्यासाठी रोहित शर्मा याचे वाढलेले वजन, सुटलेले पोट याकडे बोट दाखवले जाते. मात्र, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी रोहित शर्माने वजन कमालीचे कमी केले असून स्वत:मध्ये खूप मोठा बदल घडवून आणला आहे. मुंबईत मंगळवारी सीएट क्रिकेट पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी ब्लेझर घालून आलेल्या रोहित शर्माला पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रोहित शर्मा याचे पोट पूर्णपणे कमी झाले असून तो एकदम स्लिम ट्रिम दिसत होता. एरवी रोहित शर्मा म्हटलं की, थोडसं सुटलेलं पोट अशी प्रतिमा डोळ्यांसमोर यायची. क्रिकेटप्रेमींनीही रोहित शर्मा याला आहे त्या अवतारात स्वीकारले होते. परंतु, बीसीसीआय आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून वारंवार रोहित शर्मा याच्या वाढलेल्या वजनाचा मुद्दा पुढे केला जायचा. मात्र, रोहित शर्मा याने आता स्वत:मध्ये कमालीचा बदल घडवून गौतमी गंभीर आणि इतर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

रोहित शर्मा हा 38 वर्षांचा असून आता त्याच्या कारकीर्दीचा उतरणीचा काळ सुरु झाला आहे. मात्र, भारतीय संघाला अनेक जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा याला इतक्या तडकाफडकी कर्णधारपदावरुन दूर करणे भारतीय क्रिकेटप्रेमींना रुचलेले नाही. त्यामुळे रोहित शर्माविषयी अनेकजण सहानुभूती व्यक्त करत आहेत. अशातच रोहित शर्मा याने स्वत:मध्ये कमालीचे ट्रान्सर्फोमेशन करुन आपण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहोत, असा संदेश बीसीसीआयला दिला आहे.

आणखी वाचा

रोहित शर्मा अन् विराट कोहली आता ODI फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार?; ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं मोठं विधान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget