एक्स्प्लोर

Baramati News : बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा,टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी

Baramati News : बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा,टंचाईचा आढावा घ्या, अशी खासदार सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी केली आहे.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा (Baramati News)  अतिशय कमी (Rain) पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई  (Water Tanking)निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

खासदारांना सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे. पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तोवरच ही परिस्थिती असून ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

शासनाला ही सर्व परिस्थिती दिसत असूनही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे, असे सांगत सुळे यांनी, 'नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते', असे पुढे नमूद केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट

यंदा अपेक्षित पाऊस  झाला नसल्याने अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, जायकवाडी धरणातील  पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच, जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे. यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. अशात जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर  जालनाजिल्ह्यासह औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. सध्या जायकवाडी धरणात 38.42 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करत दोन मित्रांकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full Majha Vision 2024 : बाळासाहेब असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतंBachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासाUddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवालABP Majha Headlines : 11 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
Embed widget