एक्स्प्लोर

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून 12 जण एटीएसच्या ताब्यात

नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून काल तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान एटीएसच्या पथकाने हस्तगत केले.

मुंबई: नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या देशी बॉम्बप्रकरणी अटक केलेल्या तिघांच्या संपर्कात असणाऱ्या 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. राज्यातील विविध भागांमधून 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. ह्या सगळ्यांना मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, नालासोपारामधून ताब्यात घेतलं असून त्यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आलं आहे. प्रकरणात त्यांची भूमिका असल्याचं समोर आल्यास त्यांना अटक केली जाईल, असंही एटीएसने सांगितलं आहे. नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून काल तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान एटीएसच्या पथकाने हस्तगत केले. तसंच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळकेरला एटीएसने अटक केली होती. एटीएसने कोर्टात काय माहिती दिली? - नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत 20 गावठी बॉम्ब, 2 जिलेटिनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. - शरद कळसकरकडे बॉम्ब कसा बनवायचा? याचा नोट सापडली, तर वैभव राऊतकडून 22 गोष्टी हस्तगत केल्या आहेत. शिवाय, सुधन्वा गोंधळेकर हा दोघांशी फोनवर संपर्कात होता. - बॉम्बचा वापर कुठे होणार होता?, कसा होणार होता? हे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का? याचा तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. कुणाचा कुणाशी संबंध? धक्कादायक म्हणजे, सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे सनातन प्रभात वृत्तपत्रातील एका वृत्तावरुन समोर आले आहे. शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची आहे. तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त आहेत. वैभव राऊतकडे काय काय सापडलं? 12 देशी बॉम्ब 2 जिलेटीन कांड्या 4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सेफ्टी फ्यूज वायर 1500 ग्राम पांढरी पावडर विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या 6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स बॅटरी कनेक्टर कन्व्हरसह अन्य साहित्य प्रकरण काय आहे? महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारआळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसने देशी बॉम्बसह, त्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे. सनातन संस्थेचं स्पष्टीकरण वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget