चालू बसमध्ये ड्रायव्हरची तब्बेत बिघडली, प्रसंगावधान साधत महिलेने वाचवले सर्वांचे प्राण
पुण्यातील एका महिलेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालू बसमध्ये ड्रायव्हरची अचानक तब्बेत बिघडली, त्याला फिट आली होती. यावेळी प्रसंगावधान साधत बसमधील एका महिलेने त्या बसचे स्टेअरिंग हाती घेतले.
![चालू बसमध्ये ड्रायव्हरची तब्बेत बिघडली, प्रसंगावधान साधत महिलेने वाचवले सर्वांचे प्राण when the driver health deteriorated the woman takeover steering of the bus in pune चालू बसमध्ये ड्रायव्हरची तब्बेत बिघडली, प्रसंगावधान साधत महिलेने वाचवले सर्वांचे प्राण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/15/31767eb2d400a030e7bac432762bff31_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : महिला या कायम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात असे म्हटले जाते. महिला या पुरुषांच्या बाबतीत कुठेच कमी नाहीत, याचाच प्रत्यय पुण्यात आला. पुण्यातील एका महिलेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालू बसमध्ये ड्रायव्हरची अचानक तब्बेत बिघडली, त्याला फिट आली होती. यावेळी प्रसंगावधान साधत बसमधील एका महिलेने त्या बसचे स्टेअरिंग हाती घेतले. तसेच ती मिनी बस दवाखान्यापर्यंत नेली. त्यामुळे ड्रायव्हरवर वेळेत उपचार झाले. या बसमध्ये जवळपास 22 ते 23 महिला होत्या. या महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
योगिता सातव असे या महिलेचे नाव आहे. त्या पुण्यातील वाघोलीच्या रहिवासी आहेत. गावातील 22 ते 23 महिला मिळून मोराची चिंचोलीला गेल्या होत्या. तिथून परतत असताना ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडली. त्याला फिट आली होती. मग योगितानं यांनीचं ती मिनी बस चालवून दवाखान्यापर्यंत आणली. त्यामुळं ड्रायव्हरवर वेळेत उपचार झाले तसेच पुढे होणारा धोका देखील टळला. योगिता यांना ड्रायव्हिंग येत असली तरी त्यांचा बस चालवण्याचा हा पहिलाचा अनुभव होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून योगिता सातव यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या ड्रायव्हर बोलावून सर्व महिलांना सुखरुप घरी सोडण्यात आले. या घटनेनंतर योगिता सातव यांच्या धाडसासे सर्वत्र कौतुक केले जात आहेत त्यांनी योग्य प्रसंगावधान दाखवत केलेल्या कामगिरीमुळे पुढे होणारा मोठा धोका टळला आहे. या घटनेनंतर वाघोली गावच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील आणि ज्यांनी ही ट्रीप आयोजीत केली होती त्या आशा वाघमारे या दोघींनी योगिता यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जयश्री पाटील यांनी सांगितले की, चारचाकी गाडी अनेक महिला चालवतात. मात्र, अशा गंभीर परिस्थित बस चालवणे कठीण होते. हे खूप हिंमतीचे काम होते, ते काम योगिता सातव यांनी पूर्ण केले आहे. योगिता सातव यांनी केवळ त्या ड्रायव्हरचेच नाहीत तर बसमध्ये असलेल्या सर्व महिलांचे प्राण वाचविले असल्याची माहिती देखील यावेळी जयश्री पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)