एक्स्प्लोर

Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार म्हणाले मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं; सुप्रिया सुळे म्हणतात हे...

अजित पवारांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याचं सरकारने उत्तर द्यायला हवं, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

पुणे मोक्का (Mcoca Act) लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत केलं. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावरच आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याचं सरकारने उत्तर द्यायला हवं, असं त्या म्हणाल्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं.
 
सुप्रीम कोर्टाची मी आभारी!

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं सुप्रिया सुळेंनी आभार मानले. त्यासोबतच शरद पवारांना सोडून गेल्यानंतर फोटो का वापरायचा?,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. इलेक्ट्रोरल बॉण्ड कोणी दिले, ते कोणत्या पक्षाला दिले शिवाय कोणाला मिळाले, यासंदर्भात सगळी माहिती मिळायला हवी. त्यासोबतच इलेक्ट्रोरल बॉण्डची श्वेतपत्रिका काढायला हवी, असं देखील त्या म्हणाल्या. 

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते, असं अजित पवार बारामतीत म्हणाले होते. 

इतर महत्वाची बातमी-

Vijay Shivtare Meet CM EKnath Shinde : विजय शिवतारे 7 तास थांबून मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री म्हणाले दोन दिवस शांत रहा, शिवतारेंनी धडाधड सगळंच सांगून टाकलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेशSambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Embed widget