Vijay Shivtare Meet CM EKnath Shinde : विजय शिवतारे 7 तास थांबून मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री म्हणाले दोन दिवस शांत रहा, शिवतारेंनी धडाधड सगळंच सांगून टाकलं!
विजय शिवतारेंशी झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पुणे : माजी मंत्री विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामती लढवण्याचा निर्धार केला. महायुतीकडून बारामतील जागा अजित पवार गटाला ( Ajit Pawar) देण्यात येणार आहे. त्यात आता शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारेंनीच अजित पवारांविरोधाच शड्डू ठोकला आहे. मात्र विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत अजित पवारांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीसाठी बोलवलं होतं. यावेळी शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवलं. या तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
आपण मुख्यमंत्र्यांना भेटून स्थानिक परिस्थिती काय आहे. लोकांची मनस्थिती काय आहे. पवार विरुद्ध पवार यात जे 48 टक्के लोक पवारांच्या विरोधात आहे. त्यांना मतदानाची संधी द्यायला हवी आणि सध्याची स्थानिक नेत्यांची इच्छा काय आहे, याची माहिती दिल्याचं शिवतारे म्हणाले. बारामती लोकसभा निवडणूक लढणार यावर पुढे गेलो आहोत. तरीही आपण या सगळ्या परिस्थितीचा विचार महायुतीने करावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचं ते म्हणाले.
बारामतीतील जागा अजित पवार गटाची आहे. या जागेसाठी महायुती निर्णय घेईल. राजकारणात काही मर्यादा ओलांडू नये, त्यामुळे मी माझ्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही. माझं म्हणणं, माझी परिस्थिती आणि बारामतीतील परिस्थिती मी मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांशी चर्चा करुन निर्णय देतील, असं शिवतारेंनी सांगितलं.





















