(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Porsche Car Accident : ससून डाॅक्टर की राजरोस पांढरपेशा मवाल्यांचा अड्डा? तावरे आणि हळनोरनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन पोराचे सॅम्पल घेतले कचऱ्यात फेकले
ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune Porsche Car Accident : पुण्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयातील कारभार आता दिवसागणिक चव्हाट्यावर येऊ लागला आहे. ड्रग्स प्रकरणात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये या रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानंतर आता अग्रवाल पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) सुद्धा या डॉक्टरांनी कारनामा केल्याचे समोर आलं आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशाल अग्रवालच्या फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल
इतकंच नव्हे तर त्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी दुसरेच सॅम्पल घेऊन ते तपासल्याचं समोर आला आहे हा सर्व प्रकार पुणे पोलिसांनी दिलेल्या दुसऱ्या संपलमध्ये समोर आला आहे. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन पोराचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांचा संशय बळवल्याने त्याचा दुसरा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात देण्यात आलं होतं. त्याठिकाणी विशाल अग्रवाल आणि त्याच्या पोराचे सॅम्पल मॅच झाल्याने डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अग्रवालच्या फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल केला होता. ससून रुग्णालयातील पहिलाच रिपोर्ट पुणे आरोपीने नशा न केल्याचा आल्याने या प्रकरणांमध्ये संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा घेत ते खबरदारीचा उपाय म्हणून औंधमधील सरकार रुग्णालयामध्ये दिले होते.
पोलिसांच्या तपासामध्ये श्रीहरीने हे कृत्य डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याने रक्ताचे नमुने बदलले होते. पुणे पोलिसांनी दोघांना मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
विशाल अग्रवालचा पाय आणखी खोलात
दरम्यान, ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात विशाल अगरवालला अटक होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरला धमकाल्याच्या प्रकरणातही पुणे पोलिस ताबा मागणार असतानाच आता विशाल अग्रवालच्या विरोधात आणखी एक वॉरंट निघालं आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेला ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवालच्या विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या