Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा घोड्यावरुन प्रचार; मी घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतं; अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल
मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतंय?, असा टोला विरोधकांना कोल्हे यांनी लगावला.
आळे, पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास (Shirur Loksabha Constituency) आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे गावोगावी प्रचार करत आहे. 2019 च्या निवडणुकीत घोड्यावरुन प्रचार केल्यानं ते चर्चेत आले होते. यावेळीदेखील ते घोड्यावरुन प्रचार करताना दिसले. जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. निमगाव सावा, साकोरी त्यांनतर पारगाव तर्फे आळे या गावात अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले. पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, की मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतंय?, असा टोला विरोधकांना कोल्हे यांनी लगावला.
यावेळी अमोल कोल्हे यांना गोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. त्याला प्रतिसाद देत अमोल कोल्हे घोड्यावर बसले यांच्या सोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी गोड्यावर बसवत मिरवणूक काढली. दरम्यान सकाळी निमगाव सावा येथे ग्रामस्थांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत केले. त्याचबरोबर साकोरी येथे देखील अमोल कोल्हे यांची मोठी सभा पार पडली तर पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी तर कोल्हे यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढली.
यापूर्वी कोल्हे यांनी 2019 साली लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आश्वासन दिले होते की, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार आणि तो शब्द अमोल कोल्हे यांनी पूर्ण केला. फेब्रुवारी 2022 मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर घोडी धरली होती त्यानंतर आज पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : चि. मतदार, चि.सौ.का. लोकशाही; पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन
Murlidhar Mohol : तरुणांसाठी रिल्स तर जेष्ठांसाठी घरोघरी दौरे; मुरलीधर मोहोळांचा दणक्यात प्रचार सुरु