Pune News : चि. मतदार, चि.सौ.का. लोकशाही; पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन
पुण्यात (Pune News) एका विवाहाची निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली . ही पत्रिका आहे चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची. पुणेकरांनी (Pune Election Wedding card) मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे.
पुणे : राज्यात सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सुरु आहे. राज्यभर प्रचार दौरे आखले जात आहेत. त्यात प्रचारासाठी विविध प्रकारच्या रणनितीदेखील आखल्या जात आहे. सोशल मीडियावरदेखील (Social Media) रिल्स आणि पोस्टच्या माध्यामातून लोकांपर्य़त पोहचू पाहत आहेत. त्यातच पुण्यात (Pune News) एका विवाहाची निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली . ही पत्रिका आहे चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची. पुणेकरांनी (Pune Election Wedding card) मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे.
13 मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी ही निमंत्रण पत्रिका असून 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण देण्यात आलं आहे.लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा देशाच्या नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह 13 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या शुभमुहूर्तावर होणार आहे, असा उल्लेख लग्नपत्रिकेत केला आहे.
पत्रिकेत नेमकं काय लिहिलं आहे?
13 मे 2024 रोजी, सकाळी 7 ते सायं. 5 या शुभमुहूर्तावर लोकसभा 2024 च्या निमित्ताने भारतीय संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदान रुपी आशिर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा हेची निमंत्रण अगत्याचे, असं पत्रिकेत लिहिलं आहे. सगळीकडे लोकशाहीच्या सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्यात या पात्रिकेची चांगलीच चर्चा रंगत आहे. यापत्रिकेच्या माध्यमातून मतदानासाठी जगजागृती करण्यात येत आहे आणि आणि मतदानाचं आवाहनदेखील करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक ठिकाणी मतदार जगजागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे. विविध माध्यमांतून लोकांना मतदानासाठी जागृत केले जात आहेत. त्याचवेळी सामाजिक संघटनांकडून जागृती केली जात आहे. काहीच दिवसांपूर्व पुणे जिल्ह्यातील आंबेगावाता झालेल्या एका विवाहसोहळ्यात सगळ्यांनी मतदानाची शपथ घेतली होती. शिवायत वर आणि वधुंनीदेखील मतदान करुन नव्या आयुष्याचं पहिलं पाऊल टाकू, अशी शपथ घेतली होती. त्यांच्या विवाहाचीदेखील जोरदार चर्चा झाली होती.
इतर महत्वाची बातमी-