एक्स्प्लोर

Murlidhar Mohol : तरुणांसाठी रिल्स तर जेष्ठांसाठी घरोघरी दौरे; मुरलीधर मोहोळांचा दणक्यात प्रचार सुरु

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दणक्यात प्रचाराला लागले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. पुण्यातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या घरी जाऊन ते भेटीगाटी घेत आहेत.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दणक्यात प्रचाराला लागले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. पुण्यातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या घरी जाऊन ते भेटीगाटी घेत आहेत. मात्र यात सामान्य जनता मागे पडू नये, याचंदेखील भान राखताना दिसत आहे. त्यासोबतच सोशल मीडियावरुनदेखील दणक्यात प्रचार सुरु असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स देणं आणि रिल्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहचत असल्याचं दिसत आहे. तगडं सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत प्रचार करताना दिसत आहे.

भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'हर घर मोदी परिवार' या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 10 हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 10 लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी या सगळ्यांनी मोहोळांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. या अभियानाअंतर्गत आज सकाळी सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दहा हजार कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन अडीच लाख कुटुंबातील दहा लाख मतदारांशी संवाद साधला.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 12 कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या उपलब्धींची मतदारांना माहिती दिली. विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदींनी दहा वर्षे केलेले कार्य आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल असा विश्वास वाटतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

मला मतदान रुपी आशीर्वाद द्या!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे. महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मुरलीधर मोहोळ म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : मित्राच्या नादाला लागून लेकीनं आईचा जीव घेतला, जखमेवरुन पोलिसांना संशय आला, मामाच्या एका प्रश्नानं हत्येचा कट समोर आला; पोलिसांनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमकRaigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
Embed widget