(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasant More : वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट का घेतली?, कारण आलं समोर...
फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी अचानक शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील (baramati Loksabha 2024) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती .
पुणे : फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी अचानक शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील (baramati Loksabha 2024) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती . मात्र या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे देखील पोहचले. या भेटीमुळे पुण्यातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यांनी भेट का घेतली? याचं करण समोर आलं आहे. मात्र या भेटींमुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले.
शरद पवार यांची भेट निव्वळ सामाजिक कामासाठी होती असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कात्रज दूध उत्पादक संघाच्या एका 9 एकर भूखंडावर मैदानाचे आरक्षण आहे. असे असताना राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्यांच्या साह्याने हे आरक्षण उठवून भूखंडाचा दुसऱ्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आपला विरोध आहे. मैदान मैदानच राहावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही या कामाला विरोध करायला हवा, असे निवेदन खासदार सुळे यांना देण्यासाठी मी गेलो होतो.
मंगळवारी नेमकं काय घडलं होतं?
पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात खरं तर बैठक बोलाविण्यात आली होती शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची. मात्र, वसंत मोरे बोलावलेले नसताना या बैठकीच्या ठिकाणी पोहचले. ही बैठक सुरु असताना वसंत मोरे शरद पवारांना भेटायला आतमधे पोहचले. शरद पवारांनी दोन मिनिटे वसंत मोरेंना वेळ दिला आणि वसंत मोरे बैठकीतून बाहेर पडले. मात्र, दोन मिनीटांच्या या बैठकमुळे वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरु झाली.
स्टेटसमुळे कायम खळबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली . शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. "कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार." त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली. त्यानंतर थेट ते शरद पवारासोबत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
इतर महत्वाची बातमी-
BMC : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली होणार, बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश