(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिसतो हापूस... असतो बोगस! पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल, कृषी उत्पन्न समितीची व्यापाऱ्यांवर कारवाई
Duplicate Hapus Mango : पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल झाला आहे. कृषी उत्पन्न समितीकडून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आंब्याच्या 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Duplicate Hapus Mango : हापूसचा हंगाम सुरु झाला असून फळांचा राजाचं आगमन बाजारात झालं आहे. पण तुम्ही खरेदी करत असलेला आंबा हापूसच आहे का? हे एकदा पडताळून घ्या. कारण हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बाजारपेठांमध्ये हापूस दाखल झाला आहे. अशातच हापूस म्हणून कमी प्रतिचा आंब्याची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. पुण्यामध्ये बनावट हापूस दाखल झाला आहे. हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन फसवणूक केली जात आहे. पुण्यात ग्राहकांची अशीच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट हापूसच्या 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही बाजार समितीच्या प्रशासकांनी दिला आहे.
हापूसच्या नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची विक्रि करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात वाढीस लागलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं मात्र अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत बनावट हापुसच्या 42 पेट्या जप्त केल्या आहेत. कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्यानं ग्राहकांबरोबरोच कोकणातील शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे इथुन पुढे अशी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल, असं बाजार समितीच्या प्रशासकांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : Mango : कर्नाटकी आणि अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा?
नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली असून रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र सामान्यांना परवडणाऱ्या आंब्यासाठी एप्रिल महिन्यात वाट पाहावी लागणार आहे. यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आता काही प्रमाणात आवक वाढली असली तरी आंब्याचे दर मात्र पेटीमागे 2 हजार ते 5 हजारांपर्यंत आहेत. 20 एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha