एक्स्प्लोर

Ambadas danve on Nikhil Wagle Attack : फडतूसपणा बंद करा! पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

निखिल अंबादास दानवेंनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एक्सवर त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फडतूसपणा बंद करा, पुण्याच्या रस्त्यावरच दहशतीचे दर्शन होत असल्याचं ते म्हणाले आहेत. 

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाला जात असताना भाजपकडून पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाईफेकदेखील करण्यात आली. यावेळी काही शरद पवार गटाच्या महिलांना भाजपकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणावरुन आता विरोधीपक्षाकडून टीका केली जात आहे. हा सगळा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचं विरोधक म्हणत आहे. यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas danve) सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एक्सवर त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. फडतूसपणा बंद करा, पुण्याच्या रस्त्यावरच दहशतीचे दर्शन होत असल्याचं ते म्हणाले आहेत. 

अंबादास दानवेंनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?

अंबादास दानवे यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोंदींवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान मोदी महिला सबळ करण्याच्या गप्पा करतात आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा.. फडतूसपणा बंद करा.. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करीत असताना त्यांच्या संरक्षणासाठी सरसावलेल्या भक्ती कुंभार आणि इतर भगिनींना देखील भाजपाच्या गुंडांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ आहे. 

शरद पवार गटातील महिलांनी कोणते आरोप केले?

अंबादास दानवे यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात वागळेंवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेली महिला दिसत आहे. या महिलेच्या अंगावर शाई उडलेली दिसत आहे. 'भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या घरात महिला नाही आहेत. त्यांनी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे. या कार्यकर्त्यांनी विरोधक असलेल्या महिलांच्या अंगावर शाईफेक केली, दगडफेक केली. त्यासोबत पुरुषांनी काही महिलांचे कपडेदेखील फाडले. ही पुण्याची संस्कृती आहे का?छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची तुम्ही भाषणं करता. ती भाषणं फक्त देऊ नका तर ते भाषणं तुम्हीदेखील ऐका. देश नेमका कोणत्या मार्गाने पुढे जात आहे. जरा माणुसकीच्या नात्याने लोकांबरोबर वागा. पोलीस प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती असूनही कोणी मदतीला पुढे आलं नाही. पोलिसांवरही गुन्हे दाखल व्हावे, अशी कळकळीची विनंती पोलीस अधिकाऱ्यांना करते. महिलांनी कुटुंबियांना नेमकी काय उत्तरं द्यायची. महिलांनी राजकारणात उतरायचं की नाही, असे अनेक आरोप शरद पवार गटातील महिला कार्यकर्त्यांनी केले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Ravindra Dhangekar On Nikhil Wagle Attack : मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आणू नका, निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ला पोलिसांच्या संगनमताने; आमदार रविंंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget