एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ajit Pawar On Baramati Lok Sabha Election : बारामतीचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल; अजित पवारांचं सूचक वक्तव्य

बारामती लोकसभेच्या उमेदवाराचा सस्पेंस कायम ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण बारामतीचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार उमेदवार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची (NCP Loksabha Candidate) घोषणा केली आहे. रायगडमधून महायुतीचा उमेदवार म्हणून सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. बाकी उमेदवारांची घोषणा 28 मार्चला करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यासोबतच बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha Election) उमेदवाराचा सस्पेंस कायम ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. पण बारामतीचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) उमेदवार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

बारामतीचा उमेदवार कोण?

बारामतीतील उमेदवार कोण असेल?, असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की, बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जाहीर करु. बारामतीच्या उमेदवारांचा सस्पेंस कायम ठेवणार आहे. माध्यमांत अनेक बातम्या फिरत आहे. त्या बातम्या पाहून सस्पेंस कायम ठेवला आहे. मात्र एक सांगतो. बारामतीतील उमेदवार तुमच्या मनातलाच असेल, असं सुचक वक्तव्यदेखील त्यांनी केली आहे.

अजित पवारांसोबतच्या राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं? 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे. तसेच, बारामतीचा उमेदवार बदलणार नाही आणि विजय शिवतारे यांचा एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही तटकरेंनी सांगितलं. बैठकीतील लेखाजोगा सांगताना सुनील तटकरेंनी यासंदर्भात माहिती दिली.  

एनसीपीतील आमदारांना मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक अमदरसोबत पाच ते सहा जण असतील, प्रचार नियोजन, महायुती उमेदवार तिथे समन्वयक ठरवण्यात आले आहेत. पाच टप्पे असून वेळ आहे त्याचा चांगला वापर करा. 28 पर्यंत अंतिम तारीख आहे, त्यामुळे सभा नियोजन करा, खोटा प्रचार रोखा, अशा सूचना बैठकीत आमदारांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

मोठी बातमी : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यात मोठी घोषणा

Shivaji Adhalrao Patil Join NCP :आढळराव पाटील आज हाताला धड्याळ बांधणार;  शिरुरमध्ये घडामोडींना वेग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीलाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBarsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Cyclone Fengal: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
Cyclone: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Embed widget