मोठी बातमी : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यात मोठी घोषणा
NCP candidate list : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे.
पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Loksabha) पुन्हा एकदा सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांना उमदेवारी देण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं.
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बैठक
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार आहे.
या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे 99 टक्के काम झाले. मात्र 28 तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार आहे. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. इतर उमेदवारांची नावे 28 तारखेला जाहीर करण्यात येतील.
कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन - किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. प्रत्येक मंत्र्यावर एका लोकसभा मतदारसंघाची तर प्रत्येक आमदारावर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे. बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल.
सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील.
शिवतारेंबाबत नो कॉमेंट्स.
लोकसभेसाठी रणनीती
महादेव जानकर यांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकांनी पसरवली, बारामतीचा उमेदवार बदलणार नाही. विजय शिवतारे यांचा एकनाथ शिंदे निर्णय घेतील. एनसीपीतील आमदारांना मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक अमदरसोबत पाच ते सहा जण असतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
प्रचार नियोजन, महायुती उमेदवार तिथे समन्वयक ठरवण्यात आले. मतदानाचे पाच टप्पे असून, वेळ आहे त्याचा चांगला वापर करा. २८ तारखेपर्यंत अंतिम फॉर्म्युला जाहीर होईल. सभा नियोजन करा, खोटा प्रचार रोखा अशा सूचना अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.
संबंधित बातम्या
अजित पवारांनी जाहीर केलेल्या 4 जागांवर 2014 आणि 2019 मध्ये काय झालं होतं?