एक्स्प्लोर
Advertisement
भाजपाध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्र्यांसह पालख्यांच्या दर्शनाला
भाजपाध्यक्ष अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत.
पुणे : भाजपाध्यक्ष अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात तर तुकोबांच्या पालखीने नाना पेठेतल्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम घेतला.
पुणे शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक पालखीच्या दर्शनाला येतात. आज दिवसभर दोन्ही पालख्यांच्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं.
दरम्यान काल दोन्ही पालख्यांचा संगम सोहळा पुणे शहरात पार पडला. या अद्भूत संगम सोहळ्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement