एक्स्प्लोर

क्वॉरंटाईन रुग्णांपैकी कुणी पळून गेल्यास कायदेशीर कडक कारवाई - दीपक म्हैसेकर

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना हा विषय गंभीर झाला आहे, यासंदर्भात आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात कोरोनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात असल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 17 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लूचा सुद्धा पुण्यामध्ये जास्त प्रभाव दिसून आला होता, अगदी त्याचप्रमाणे यंदाही कोरोनाचं प्रमाण पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्यांना 24 तासासाठी संस्थात्मक क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. क्वॉरंटाईनसाठी जी व्यवस्था करण्यात आली होती त्यात 250 जणांची भर करण्यात आली आहे, यापूर्वी 550 जणांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था होती.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्याची नवी व्यवस्था बालेवाडी परिसरात केली गेली आहे. क्वॉरंटाईन केल्या गेलेल्या नागरिकांपैकी जर कुणी पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा उपचार टाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाची चाचणी सुरू असलेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या काही घचना घडल्या आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणखी काही नागरिकांना त्याची लागण झाली. इटलीवरून परतलेल्या एका भारतीय महिलेच्या अशाच निष्काळजीपणामुळे इतरांनाही बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील क्वॉरंटाईन केलेल्यांपैकी कुणी पळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

Rajesh Tope On coronavirus | राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती स्थिर : राजेश टोपे

पुढील सात दिवस अत्यावश्यक सरकारी कार्यालयं वगळता इतर कार्यालयं बंद राहतील अशी माहितीदेखील आयुक्तांनी दिली. आरटीओकडून दिले जाणारे नवे लायसन्स 31 मार्चपर्यंत दिले जाणार नाहीत. आरटीओ आणि आधार कार्ड सेंटर्स काही काळासाठी नागरिकांसाठी बंद असतील कारण या ठिकाणांवर होणारी लोकांची गर्दी जास्त प्रमाणात आहे. नव्या वाहनांचं रजिस्ट्रेशन आरटीओमध्ये जाऊन न करता संबंधित वाहनांच्या शो-रुममध्ये जाऊन करू शकता येणार आहे. लायसन्स रिन्यू करायचं असल्यास ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.

कोरोनापासून सावधान राहण्यासाठी सॅनिटायझर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि याचाच फायदा घेत कमी दर्जाचं सामान वापरून फेक सॅनिटायझर बनवण्यात येत होतं, अशाच खराब दर्जाचं एक लाखाचं सॅनिटायझरचं  औषध निरीक्षक कार्यालयाने सामान जप्त करण्यात आलं आहे.

Coronavirus | कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur People Reaction on Liquor Rates : 500 रुपये पगार आहे 450 दारुवर जातात, दारु महागल्यानं संताप!Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 11 June 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 07:00AM : 11 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स, ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचलं
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स, ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचलं
Embed widget