एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी
बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उन्हाळी शिबिरे, कोचिंग कॅम्पचे आयोजन करू नये असा आदेश दिला आहे. लोकांची गर्दी होईल असे विवाह समारंभ ,वस्तू प्रदर्शन असे कार्यक्रम रद्द करावेत असा आदेश देण्यात आला आहे.
बेळगाव : परदेशातून आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शनिवारी (14 मार्च) निपाणी येथून आलेल्या एका व्यक्तीची आणि बेळगाव येथील एकाची अशा दोघा संशयितांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बेंगळूरमध्ये हॉटेलमध्ये कामाला असलेली एक व्यक्ती बेळगावला परतली आहे. बंगळूरहून आलेल्या हॉटेल कामगाराला सर्दी, ताप व घशाचा त्रास जाणवत होता. ही माहिती त्याच्या मित्रांना कळल्या नंतर शनिवारी सायंकाळी त्याच्या काही मित्रांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी आणले. कोरोना संशयितांसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष विभागात त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
#CoronaVirus | शहरातील शाळा, महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत तर मॉल्स 15 दिवसांसाठी बंद - मुख्यमंत्री
निपाणीतील एक तरुण नोकरीसाठी इटलीत होता. तो काही दिवसांपूर्वी निपाणीत परतला आहे. इटलीहून परतलेल्या निपाणी येथील या चोवीस वर्षाच्या तरुणाला ताप आणि सर्दी झाल्याने त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उन्हाळी शिबिरे, कोचिंग कॅम्पचे आयोजन करू नये असा आदेश दिला आहे. लोकांची गर्दी होईल असे विवाह समारंभ ,वस्तू प्रदर्शन असे कार्यक्रम रद्द करावेत असा आदेश देण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे नसली तरी परदेशातून आलेल्या व्यक्तीने कोरोनाबाबत सरकारी तपासणी करून घेणे आवश्यक असून चौदा दिवस घरातून बाहेर पडू नये असेही कळविण्यात आले आहे.
संंबंधित बातम्या :
Coronavirus | देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात एकूण 31 कोरोनाग्रस्त रुग्ण
#CoronaVirus राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्यापासून सुट्टी! दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement