Shrikant Deshmukh Pune: सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Shrikant Deshmukh Pune: सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
श्रीकांत देशमुख आणि पीडित यांची पुर्वीपासून ओळख होती. मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना त्यांचीआणि पीडित महिलेची ओखळ वाढत गेली. श्रीकांत यांनी पीडित महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. तुळजापुरच्या मंदिरात लग्न करणार असं सांगितलं होतं. त्यानंतर पीडित महिलेला श्रीकांत यांनी फसवल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता.
या प्रकरणाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली होती. 'भाजपा सोलापूर (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या संदर्भातला व्हिडियो समोर आला आहे, यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं. प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे', असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
भाजपा सोलापूर (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या संदर्भातला VDO समोर आलाय यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं
प्रदेशध्यक्ष @ChDadaPatil नी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे @BJP4Maharashtra @bjp4solapur
">
या व्हिडियोमध्ये ते एका महिलेसोबत वाईट अवस्थेत दिसत होते. दोघांचं काय नातं होतं हे या व्हिडियोतून स्पष्ट झालं नव्हतं. मात्र महिला व्हिडियोत अनेक गोष्टी सांंगताना दिसत होती. तिची फसवणूक होत आहे, असंही महिला व्हिडियोत म्हणताना दिसत आहे. त्यावेळी श्रीकांत यांनी मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडियोत दिसत आहे.