एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण

Bhaskar Jadhav meets Pratap Sarnaik: भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी एका प्रकरणात त्यांना मातोश्रीवरुन समजही देण्यात आली होती.

Bhaskar Jadhav meets Pratap Sarnaik: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असलेले कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarniak) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि प्रताप सरनाईक यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूरच्या एका हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. हॉटेलच्या लॉबीत बोलत असतानाचा या दोघांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे उरलेसुरले शिलेदार गळाला लावण्यासाठी 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) पुन्हा सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या गोटातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics news)

भास्कर जाधव यांच्यासोबतच्या या भेटीबाबत प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, नगरविकास राज्यमंत्री असताना मी भास्कर जाधव यांच्याकडे माझी कामं घेऊन जायचो. आमदार हा मंत्र्यांकडे जात असतो. मंत्री कुठल्या पक्षाचा आहे, हे आमदार बघत नसतो. भास्कर जाधवांच्या विधानसभा मतदारसंघात एसटी बससंदर्भात काही अडचणी आहेत. त्यांच्या भागात एसटी बस सुरु करायची आहे. एसटी महामंडळातंर्गत त्यांना माझ्याकूडन काही मदत हवी असेल तर मी मदत करेन. त्याचा ऑपरेशन टायगरशी संबंध नाही. ऑपरेशन टायगर हे सुरु आहे. मात्र, आमची भेट त्यासाठी नव्हती, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे हे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता होऊन देणार नाहीत, अशा आशयाचे वक्तव्य केले. भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचा दांडगा अनुभव आहे. त्यांना शिवसेना उबठा ने फक्त पत्र देऊन ठेवले आहे. मात्र खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते करण्याची वेळ येईल तेव्हा काय होईल ते समोर येईलच असे, उदय सामंत म्हणाले. या टीकेला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. या आणि जा याला काही अर्थ नाही. भास्कर जाधव हे पदासाठी इकडे - तिकडे जाणारे नेते नाहीत. त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे. ते उदय सामंत यांच्यासारखे खुर्ची पाहून पाळलेले नेते नाहीत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

आणखी वाचा

पैसे वाटपाचे आरोप, मालवणमधील प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं; निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर येताच काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
9605 कोटींचा हिशोब कोण देणार? अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरण कसं झालं? दोषींवर कारवाई करा: जयंत पाटील
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget