एक्स्प्लोर
120 लेटकमर्सना आजचा पगार नाही, तुकाराम मुंढेंचा बडगा
पुणे : कार्यक्षम आणि शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या IAS तुकाराम मुंढे यांनी पुण्यात आल्या आल्याच आपल्या शिस्तीचा बडगा उगारला आहे. पीएमपीएमलचा कारभार हाती घेतलेल्या मुंढेंनी कामावर वेळेत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
वेळेत कामावर न आलेल्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना आज बिनपगारी काम करावं लागणार आहे. कारण तुकाराम मुंढे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला आहे. उशिरा येणाऱ्या 120 कर्मचाऱ्यांना आजच्या दिवसाचा पगार दिला जाणार नाही.
याचसोबत 100 बंद बसेस सुरु करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेशही तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढेंची पुणे महापालिकेच्या पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तप्रिय कामाची चुणूक दाखवली होती.
तुकाराम मुंढेंनी काल पीएमपीएमएल कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्तीचे धडे दिले. टीशर्ट, जीन्स वापरु नये, वेळेत कार्यालयात यावं, कार्यालयात धुम्रपान करु नये, कामाचं ठिकाण सोडून इतरत्र जाऊ नये, व्यवस्थित गणवेश परिधान करावा इत्यादी आदेश तुकाराम मुंढेंनी काल दिले होते.
संबंधित बातम्या :
तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे
तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement