एक्स्प्लोर

Yavatmal Washim Lok Sabha: ज्या मतदारसंघात शिवसैनिकांनी तब्बल पंचवीस वर्ष गड राखला, त्याच यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघाचा उमेदवार ठरेना!

ज्या मतदारसंघाने गेली 25 वर्ष आपला शिवसेनेचा गड राखला, त्याच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिकरीचे जात आहे का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे.

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल केव्हाच वाजलं असून आजपासून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांची अधिसुचना जारी केली जाणार आहे. असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अशातच ज्या मतदारसंघाने गेली 25 वर्ष आपला शिवसेनेचा गड राखला त्याच यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जिकरीचे जात आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे.

25 वर्ष गड राखला, तरी उमेदवार ठरता ठरेना!

यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) संजय देशमुख (Sanjau Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, अजूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. या ठिकाणी सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या नावावर भाजप (BJP) अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे का, अशी शक्यता देखील या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच या यादीत भावना गवळी यांच्या नावाची वर्णी लागते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

महायुतीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim)लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा वेळोवेळी बोलून दाखवला आहे. तसेच त्यांनी गेली 25 वर्ष शिवसेनेचा हा गड एकहाती राखला आहे. त्यामुळे सध्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक चर्चाना उत आला आहे. खासदार भावना गवळी या सतत पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले असे असतानाही उमेदवारी घोषित करण्यासाठी इतका उशीर आणि आश्वासित का केला जात नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवला आहे.

भावना गवळी यांच्या नावाची वर्णी लागणार? 

नुकतीच भावना गवळी यांच्या समर्थक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुंबई गाठत वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी या देखील उपस्थित होत्या. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत कामाला लागण्याची आदेश दिले.  यावरून भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार असल्याची स्पष्ट झाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या यादीत आता भावना गवळी यांच्या नावाचा समावेश असतो, की अन्य कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget