Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज, जिल्हा कारागृहात रवानगी होणार
Walmik Karad, Beed : वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
Walmik Karad, Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आलाय. दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज देण्यात आलाय. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. पोटविकारासह इतर आजार झाल्याने वाल्मिकवर उपचार सुरू होते. वाल्मिक कराडला बुधवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
वाल्मीक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज
दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये सुरू होते उपचार
उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी
पोटविकारासह इतर आजारांवर सुरू होते उपचार
बुधवारी मध्यरात्री केले होते जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, परळीत जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला दांडीhttps://t.co/TGRxA7Q7DB
— ABP माझा (@abpmajhatv) January 25, 2025
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खराब असल्यामुळे परळीतील जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे दांडी मारली आहे. आगामी निवडणुका, महाशिवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती यांचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित होते. अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, पणन महासंघाचे संचालक विष्णुपंत सोळंके बैठकीला उपस्थित आहेत.
प्रकृती खराब असल्यामुळे बैठकीला मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित
जगमित्र कार्यालयात सुरू आहे बैठक
आगामी निवडणुका, महाशिवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती यासाठी बैठकीचे आयोजन
अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, पणन महासंघाचे संचालक विष्णुपंत सोळंके बैठकीला उपस्थित
बैठकीत कार्यकर्ते यांची पदाधिकांची प्रचंड पडते
इतर महत्त्वाच्या बातम्या