Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, परळीत जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला दांडी
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, परळीत जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला
Dhananjay Munde, Beed : मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खराब असल्यामुळे परळीतील जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे उपस्थितीत राहिलेले नाहीत. आगामी निवडणुका, महाशिवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती यांचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला धनंजय मुंडेंनी दांडी मारलीये. अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, पणन महासंघाचे संचालक विष्णुपंत सोळंके बैठकीला उपस्थित आहेत.
धनंजय मुंडेंच्या राजकीय अडचणी वाढल्या, विरोधकांनी चारीबाजूंनी घेरलं
गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी देखील सुरु आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत, असं वक्तव्य केले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंवर चारीबाजूंनी टीका झालेली पाहायला मिळत आहे. शिवाय पंकजा मुंडे यांनी सहा महिन्यांपूर्वी दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्व वक्तव्य केलं होतं. वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंच पान देखील हालत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
धनंजय मुंडेंची चौकशी करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
रामदास आठवले म्हणाले, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. त्यांच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल करा. संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडला आरोपी केले नसेल तर ते चुकीचे आहे. त्यांना फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करुन थांबू नये. कराडच्या सांगण्यावरुनच इतर आरोपींनी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. त्यांचे तसे कॅाल रेकॅार्ड समोर आले आहेत त्यामुळे त्यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ॲाफीस ॲाफ प्रॅाफीटचा आरोप केला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय ना. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सन 2025 - 26 च्या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुषंगाने… pic.twitter.com/vA4TNNiGsC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 23, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या