विजयसिंह मोहिते-पाटलांचे माढात तुतारी वाजवून स्वागत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होणार?
Vijaysinh Mohite Patil, Madha : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांचे माढा लोकसभा मतदार संघातील करकंब, जाधववाडी गावात तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले.
Vijaysinh Mohite Patil, Madha : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांचे माढा लोकसभा मतदार संघातील करकंब, जाधववाडी गावात तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजयसिंह मोहिते यांचे लोकसभा मतदार संघातील अनेक गावात तुतारी वाजवून स्वागत केले जात आहे. विजय मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) आज लग्न सोहळ्याच्या निमित्ताने करकंब,जाधववाडी या भागात आले असता त्याचे तुतारी वाजवून स्वागत केले.
2019 पासून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतरही गेल्या काही वर्षात विजयसिंह मोहिते पाटील राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील घराणे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एका लग्नसमारंभात एकत्रित आले होते. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले तर त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील वर्चस्व लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या फायद्याचं ठरु शकतं. मात्र, भाजपची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे.
धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश अमावस्येमुळे रखडलाय. धैर्यशील 9 तारखेला शरद पवार गटात प्रवेश करतील तर 15 तारखेला माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरतील, असे बोलले जात आहे. मात्र, शरद पवार गट माढातून धैर्यशील यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपकडून नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी
भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, निंबाळकर यांच्यावर सातारचे रामराजे निंबाळकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढा लोकसभेत मोहिते पाटील उमेदवार असतील तर भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या