Sanjay Raut on Sangli Loksabha Seat : आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू , संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut on Sangli Loksabha Seat : काँग्रेसला सांगली मधील केडरची चिंता होती तर, 2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक कशामुळे लढली?
Sanjay Raut on Sangli Loksabha Seat : काँग्रेसला सांगली मधील केडरची चिंता होती तर, 2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक कशामुळे लढली? काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी हातपाय का हलवले नाहीत? असे सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) आणि विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांना केले आहेत. संजय राऊत सध्या ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
निवडणूका आल्या की सांगलीतील काही लोकांचा सूर्योदय होतो
संजय राऊत म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी सांगलीची शान वाढविली. पण काहींनी शेतकऱ्यांची कर्जे बुडवून सांगलीची शान वाढवली. निवडणूका आल्या की सांगलीतील काही लोकांचा सूर्योदय होतोय.
चंद्रहार निवडून येणार नाही, असा प्रचार भाजप आणि संघाचे लोक करत आहेत, असं राऊत यांनी नमूद केलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची नक्कल करत टीका देखील केली. आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची कोंडी करू , असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय.
10 वर्षांपासून सांगलीची जागा काँग्रेसकडे नाही
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपचे लोक एक नंबरचे खोटारडे आहेत. 10 वर्षांपासून सांगलीची जागा काँग्रेसकडे नाही. वसंतदादाच्या वारसदाराचा झालेला पराभव आम्हालाही सहन होत नाही. काँग्रेसला सांगली मधील केडरची चिंता होती तर, 2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याऐवजी हातपाय का हलवले नाहीत? आपले विमान 5 वर्ष कुठे भरकटले होते? असा सवालही संजय राऊत यांनी विशाल पाटील यांना केला.
हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सांगलीत प्रचाराला यावे
कारखानादाराच्या इशाऱ्यावर सांगली जिल्ह्यातील राजकारण चालणार नाही. चंद्रहार पाटील सांगलीतून लोकसभेत जाणार, रोखण्यासाठी हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सांगलीत प्रचाराला यावे. चंद्रहार मविआचे उमेदवार आहेत आणि राहतील. कुणाला विरोध करायचा असेल तर आताच करावा. आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची कोंडी करू, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला.
2019 मध्ये कोणत्या चिन्हावर लढले विशाल पाटील?
2019 मध्ये भाजपकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर काँग्रसकडून सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही असलेले विशाल पाटील त्यांच्याविरोधात लढले होते. मात्र, विशाल पाटील यांनी ही निवडणूक स्वाभिमानीच्या चिन्हावर लढली होती. त्यामुळे संजय राऊतांनी आज सांगलीच्या सभेतून जुन्या खपल्या काढल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या