Vidhan Parishad Election : विधानपरिषदेला हायव्होल्टेज सामना रंगणार, मविआ तिसरा अर्ज भरणार, जयंत पाटील यांच्याकडून मोठी अपडेट
Jayant Patil : विधानपरिषद निवडणुकीसाठी मविआ तीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. मविआकडून प्रज्ञा सातव, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर हे अर्ज भरणार आहेत.
मुंबई : विधानपरिषदेच्या (MLC Election) 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत आहे. भाजपनं (BJP) 5 उमेदवार जाहीर केलेत, शिवसेनेनं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) दोन जागांवर अर्ज दाखल केले जातील. मविआ या निवडणुकीत तीन उमेदवार उभे करणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेसनं प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कुठलाही सस्पेन्स नसून महाविकास आघाडी तीन उमेदवार देणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या पाठिंब्यावर अर्ज भरणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. याशिवाय काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर उमेदवारी अर्ज भरतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी मला स्वतः सांगितले की नार्वेकर उमेदवार असतील. जी काही ताकद विधानपरिषदेसाठी लागणार आहे त्या आमदारांची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. मला शरद पवार यांनी शब्द दिला होता आता उर्वरित मतही मला इंडिया आघाडीची मिळतील, असंही जयंत पाटील म्हणाले. इंडिया आघाडीकडे 69-70 मतं आहेत. तीन जागा निवडून येणार आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
विधानपरिषदेची निवडणूक लागणार?
विधानपरिषदेच्या 11 जागा रिक्त होत असून 11 पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले अन् वैध ठरल्यास निवडणूक लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपनं 5, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 2, काँग्रेस 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शेकापचे जयंत पाटील असे 12 अर्ज आल्यास विधानपरिषद निवडणूक लागू शकते.
विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार
भाजपचे उमेदवार :
1. पंकजा मुंडे
2. योगेश टिळेकर
3.डॉ. परिणय फुके
4. सदाभाऊ खोत
5. अमित गोरखे
शिवसेना :
1. भावना गवळी
2. कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस (चर्चेतील नावं)
1. राजेश विटेकर
2. शिवाजीराव गरजे
काँग्रेस :
1. प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा
1. जयंत पाटील (शेकाप)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
1. मिलिंद नार्वेकर
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सध्याचं संख्याबळ पाहता विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल.
संबंधित बातम्या :