एक्स्प्लोर

महाविकास आघाडीचा तिढा सुटला, वर्सोवासह विले पार्ले ठाकरे गटाला, तर कल्याण पूर्वमधून धनंजय बोराडेंना संधी 

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Agahadi) जगावाटपात वर्सोवा मतदारसंघावरुन असेलाल तिढा अखेर निकाली निघाला आहे. वर्सोव्याची (Versova) जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे.  

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Agahadi) जगावाटपात वर्सोवा मतदारसंघावरुन असेलाल तिढा अखेर निकाली निघाला आहे. वर्सोव्याची (Versova) जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे.  वर्सोव्यातून माजी नरगरसेवक हरुन खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर विले पार्लेच्या जागेवरुन वाटाघाटी आप सोबत सुरु होती. मलबार हिलच्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला विलेपार्ले सुटली आहे. या मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांचं माव निश्चित करण्यात आलं आहे. 

ठाकरे गटाकडून कल्याण पूर्वमधून धनंजय बोराडे यांना संधी 

दरम्यान, कल्याण पूर्वमधून ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे यांना संधी देण्यात आली आहे. या ठिकाणचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी अटकेत आहेत. त्यामुळं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. आज ठाकरे गटाकडून कल्याण पूर्व मधून धनंजय बोराडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांसह छोट्या पक्षांकडून महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.   मुंबईतील जागा वाटपाबाबत मविआत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 23 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर

ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा,अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चेंबुर, कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व,  वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम,चांदिवली, मुंबादेवी,धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम-अस्लम शेख,चांदिवली- नसीम खान, मुंबादेवी- अमनि पटेल,धारावी- ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shivadi Assembly constituency : ठाकरेंना भेटल्यानंतर लालबागमध्ये शिवसैनिकांना दंडवत, उमेदवारी नाकारली तरी पक्षाबरोबर कायम राहणार; सुधीर साळवींची मोठी घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक, अखेर आव्हाड यांच्याकडून सभागृहाची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक,अखेर सभागृहाची माफी
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget